Beti Bachao Beti Padhao

राष्ट्रीय पेन्शन प्रणाली वात्सल्य

अल्पवयीन मुलांसाठी एनपीएस योजना

1

योजना

पीएफआरडीए यांच्यामार्फत नियमित आणि प्रशासकित करण्यात येणारी बचत आणि निवृत्तीवेतन योजना

2

पात्रता

सर्व अज्ञान व्यक्ती (वय 18 पर्यंत)

3

कार्यचालन

  • अज्ञान व्यक्तीच्या नावे खाते उघडण्यात येईल आणि पालकांकडून खाते चालविण्यात येईल
  • लाभधारक फक्त सदर अज्ञान व्यक्ती असेल
4

खाते कोठे उघडायचे

ऑनलाईन पोर्टल - https://bankofmaharashtra.in/national-pension-system (लिंक 12/09/2024 पासून उपलब्ध)

5

आवश्यक कागदपत्रे

  • पालकांची केवायसी, ओळखीचा पुरावा आणि पत्ता दाखल केल्यानंतर (आधार, वाहन चालविण्याचा परवाना, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, नरेगा जॉब कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीपत्र)
  • अज्ञान व्यक्तीचा जन्मदाखला (जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र)
  • पालक एनआरआय असेल तर एनआरई/एनआरओ बँक खाते (एकल किंवा संयुक्त)
6

जमा करण्याची रक्कम

खाते उघडण्यासाठी किमान रक्कम : रु. 1,000 /- आणि कमाल मर्यादा नाही.
त्यानंतर जमा करण्याची रक्कम वार्षिक किमान रु.. 1,000 /- आणि कमाल मर्यादा नाही.

7

निवृत्तीवेतन निधीची निवड

पीएफआरडीएकडे नोंदणीकृत असलेल्या कोणत्याही निवृत्तीवेतन योजनेची निवड पालकांना करता येईल.

8

गुंतवणुकीचे पर्याय

  1. उपलब्ध पर्याय : मॉडरेट लाईफ सायकल फंड-एलसी-50 (50% इक्विटी)
  2. आपोआप उपलब्ध : पालकांना लाईफ सायकल फंड - ॲग्रेसिव्ह-एलसी-75 (75% इक्विटी), मॉडरेट एलसी-50 (50% इक्विटी) किंवा कॉन्झरव्हेटिव्ह-एलसी-25 (25% इक्विटी)
  3. क्रियाशील निवड : पालकाने क्रियाशील होऊन वेगवेगळ्या भागांमध्ये किती रक्कम गुंतवायची याचा निर्णय घ्यायचा आहे. (75% पर्यंत), कॉर्पोरेट कर्ज (100% पर्यंत), गव्हर्नमेंट सिक्युरिटीज (100% पर्यंत) आणि अल्टरनेट ॲसेटस (5% पर्यंत).
9

रक्कम काढून घेणे, योजनेतून बाहेर पडणे आणि मृत्यू

  • तीन वर्षांच्या लॉक इन कालावधीनंतर जमा केलेल्या रकमेपैकी 25% रक्कम शिक्षण, उल्लेख केलेले आजार आणि अपंगत्व यासाठी काढता येईल. कमाल ३ वेळा
  • वय 18 झाल्यानंतर – एफपीएस टायर-1 (सर्व नागरिकांसाठी) कडे वर्ग होण्याचा पर्याय
  • वय 18 झाल्यानंतर बाहेर पडण्याचा पर्याय
    • रु. 2.5 लाखांपेक्षा अधिक असेल तेव्हा : यातील 80% रक्कम वार्षिक व्याजासाठी ठेवून आणि 20% रक्कम एकाचवेळी काढून घेता येईल.
    • रु. 2.5 लाखांपेक्षा कमी निधी जमा असेल तेव्हा : सर्व रक्कम एकाचवेळी काढून घेता येईल.
  • मृत्यू झाल्यास संपूर्ण रक्कम पालकास देण्यात येईल.