Beti Bachao Beti Padhao

महाबँक - नामनिर्देशन फॉर्म

नामांकनाची ठळक वैशिष्ट्ये

ठेव खाती

  • नामांकन असल्यास उत्तराधिकार प्रमाणपत्र किंवा मृत्युपत्राच्या /इच्छापत्राच्या प्रोबेटचा आग्रह न धरता निधी/वस्तूंचे जलद आणि सुलभ हस्तांतरण /मुक्तता होते.
  • चालू खाती, बचत बँक खाती, सर्व प्रकारची मुदत ठेव खाती, सेफ डिपॉझिट लॉकर किंवा वस्तूंचा सुरक्षित ताबा असलेल्या खात्यांसाठी नामांकन सुविधा उपलब्ध आहे.
  • नामांकन सुविधा ही व्यक्ती आणि एकल मालकीच्या प्रोप्रायटरी संस्थांसाठी आहे.
  • नामांकन केवळ एका व्यक्तीच्या नावे केले जाऊ शकते. ते विद्यमान किंवा नवीन खात्यांमध्ये केले जाऊ शकते आणि ठेवीदारांद्वारे नामांकन रद्द करता किंवा बदलता येऊ शकते.
  • ज्या खात्यांमध्ये प्रतिनिधी क्षमतेने ठेवी ठेवल्या जातात उदा. ट्रस्ट खाती इत्यादी आणि भागीदारी संस्था, हिंदू अविभक्त कुटुंब, कंपन्या, संघटना, क्लब इत्यादी खात्यांमध्ये नामांकन करता येत नाही.
  • व्यक्तींच्या संयुक्त खात्याच्या बाबतीत, सर्व खातेदारांनी एकत्रितपणे नामांकन केले पाहिजे.
  • अल्पवयीन व्यक्तीच्या खात्याच्या बाबतीत – स्वचालित असो किंवा अन्यथा – नामांकन हे सदर  अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने कायदेशीररित्या कार्य करण्याचा अधिकार असलेल्या व्यक्तीने केले पाहिजे.
  • अल्पवयीन व्यक्तीच्या नावे नामांकन करण्याची परवानगी या अटीवर दिली जाईल की, ठेवीदाराचा मृत्यू झाल्यास अशा नामांकित अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने ठेवीची रक्कम प्राप्त करण्यासाठी अन्य एका अल्पवयीन नसलेल्या (प्रौढ) व्यक्तीची नियुक्ती केली जावी. नामांकन केलेल्या अल्पवयीन व्यक्तीची जन्मतारीख पडताळून त्याची नोंद करावी.
  • मुदत ठेवीच्या नूतनीकरणानंतरही नामांकन पुढे चालू राहील, जोपर्यंत रद्द किंवा बदलले जात नाही.
  • पेन्शन जमा करण्यासाठी उघडलेल्या बचत बँक खात्यांसाठी नामांकन सुविधा उपलब्ध आहे. परंतु, बँकिंग कंपनी (नामांकन) नियम, 1985 हे पेन्शनच्या थकबाकीचा भरणा (नामांकन) नियम, 1983 पेक्षा वेगळे आहेत. पेन्शनच्या थकबाकीच्या प्राप्तीसाठी निवृत्तीवेतनधारकाने १९८३ च्या नियमांतर्गत केलेला नामांकन हे त्यांच्या बँकेतील ठेव खात्यांकरता लागू अथवा वैध असणार नाही.  या खात्यांसाठी निवृत्तीवेतनधारकास नामांकन सुविधेचा लाभ घ्यायचा असल्यास बँकिंग कंपनी (नामांकन) नियम, 1985 च्या तरतुदी अन्वये स्वतंत्र नामांकन करणे आवश्यक आहे.
  • अनिवासी व्यक्तीला निवासी खात्यात नॉमिनी म्हणून नामांकित केले जाऊ शकते. अनिवासी नामांकित व्यक्तींच्या बाबतीत, मृत व्यक्तीच्या खात्यातून/ठेवींमधून त्याला पात्र असलेली रक्कम त्याच्या NRO खात्यात जमा केली जाईल.
  • नामांकन नोंदणी केल्या नंतर मुदत ठेव पावती/पास बुक/स्टेटमेंट यावर '________ रोजी नामांकन नोंदणीकृत करण्यात आले' असे टिपण केले जाईल. (ग्राहकाने विशेषत: विनंती केल्यानंतरच नामांकित व्यक्तीचे नाव नमूद केले जाईल, अन्यथा तसे नमूद केले जाणार नाही).

वस्तूंची सुरक्षा ठेव

  • नामांकन सुविधा केवळ वैयक्तिक ठेवीदारांसाठी उपलब्ध आहे. सुरक्षित ठेवीसाठी संयुक्तपणे वस्तू जमा करणाऱ्या व्यक्तींसाठी उपलब्ध नाही.

सेफ डिपॉझिट लॉकर्स

  • सेफ डिपॉझिट लॉकर एका व्यक्तीने भाड्याने घेतले असता, केवळ एका व्यक्तीच्या नावे नामांकन केले जाऊ शकते.
  • जेथे सेफ डिपॉझिट लॉकर दोन किंवा अधिक व्यक्तींनी बँकेकडून भाड्याने घेतले असेल, तेथे एक किंवा अधिक व्यक्तींच्या नावे नामांकन केले जाऊ शकते.
  • जेथे सेफ डिपॉझिट लॉकर अल्पवयीन व्यक्तीच्या नावावर भाड्याने घेतले असेल, तेथे नामांकन हे त्या अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने कायदेशीररित्या कार्य करण्याचा अधिकार असलेल्या व्यक्तीद्वारे केले जाईल.
  • भाड्याने घेतलेल्या लॉकर मधील वस्तू स्वीकारण्यासाठी अल्पवयीन व्यक्तीला नॉमिनी म्हणून नामांकित केले जाऊ शकते. बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट, 1949 चे कलम 45 ZE लॉकरमधील सामग्री स्वीकारण्यासाठी अल्पवयीन व्यक्तीला नॉमिनी होण्यापासून प्रतिबंधित करत नाही. तथापि, जेव्हा अल्पवयीन नॉमिनीच्या वतीने लॉकरमधील वस्तू काढण्याची मागणी केली जाते, तेव्हा अशा प्रकरणांमध्ये, बँक त्यांतील वस्तू अशा व्यक्तीकडे सुपूर्द करते जी कायद्याने अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने वस्तू प्राप्त करण्यास सक्षम आहे.

नामांकन अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

नामनिर्देशन फॉर्म डाउनलोड करा - इंग्रजी      नामनिर्देशन फॉर्म डाउनलोड करा - हिंदी      नामनिर्देशन फॉर्म डाउनलोड करा - मराठी

Or

ऑनलाइन नामांकनाची सुविधा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा