Beti Bachao Beti Padhao

महाबँक - मेटाव्हर्स

पार्श्वभूमी

मेटाव्हर्स हे व्हर्च्युअल, म्हणजे आभासी जगत निर्माण करणारे नवीनतम तंत्रज्ञान आहे. या मेटाव्हर्स मध्ये तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रवेश करून व्यक्ती ते आभासी जगत बघू शकतात आणि त्याचा अनुभव घेऊ शकतात. बँकिंग क्षेत्रात मेटाव्हर्स च्या संकल्पनेचा समावेश केल्यास नवीन संधींचा फायदा घेता येईल, ज्यामध्ये ग्राहकांना अनेक नावीन्यपूर्ण अनुभव देण्याबरोबरच भावनिक जोड देखील देता येईल.

मेटाव्हर्स चे तंत्रज्ञान विकसित होत असताना, या तंत्रज्ञानाच्या मदतीने वित्त आणि वाणिज्य क्षेत्राचे भविष्य घडवण्यामध्ये बँक महत्त्वपूर्ण योगदान देईल अशी अपेक्षा आहे.

महाबँक मेटाव्हर्स मध्ये एक आभासी शाखा प्रदान करते जेथे बँकेचे मान्यवर ग्राहक वेब ब्राउझरद्वारे बसल्या जागेवरून कोठूनही मेटाव्हर्स वातावरणात प्रवेश करून त्या आभासी जगताचा अनुभव घेऊ शकतात. भविष्यात व्हर्च्युअल रिअॅलिटी उपकरणांद्वारे देखील या आभासी जगताचा अनुभव घेता येईल.

ठळक वैशिष्ट्ये :

  1. ग्राहक आर्टिफिशियल इंटेलिजन्स / मशीन लर्निंग तसेच नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग या तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार झालेल्या व्हर्च्युअल ह्युमनॉइडशी (आभासी व्यक्तीशी)  चर्चा करू शकतील जे ग्राहकांना बँकेची उत्पादने आणि सेवांबद्दल सर्व आवश्यक माहिती प्रदान करतील.
  2. व्हर्च्युअल ह्युमनॉइडद्वारे बँकेच्या प्रत्येक उत्पादन झोनमध्ये ग्राहकांचे स्वागत केले जाईल.
  3. प्रॉडक्ट लाउंज
  4. त्या विषयातील तज्ञ म्हणून ग्राहक त्या व्हर्च्युअल ह्युमनॉइडशी संभाषण करून त्या श्रेणीतील उत्पादने आणि सेवांबद्दल चौकशी करू शकतात.

याचा वापर कसा करावा :

  • खाली दिलेल्या मेटाव्हर्स बटणावर क्लिक करा
  • पूर्ण नाव, ईमेल आयडी, मोबाइल नंबर यांसारखे तुमच्या संपर्काचे तपशील एंटर करा.
  • आवश्यक तपशील प्रदान केल्यावर आपल्याला आभासी शाखेत प्रवेश दिला जाईल.

मेटाव्हर्स साठी येथे क्लिक करा

  • पुढे आणि मागे जाण्यासाठी अप आणि डाउन कर्सर की चा वापर करा
  • डावीकडे आणि उजवीकडे जाण्यासाठी डाव्या आणि उजव्या कर्सर की चा वापर करा
  • विविध इंटरअॅक्टिव आयकॉन आणि उत्पादन योजना निवडण्यासाठी माउसचे लेफ्ट क्लिक वापरा
  • आपल्या अवताराचे दृश्य बदलण्यासाठी माउसचे उजवे क्लिक दाबून ठेवा