Beti Bachao Beti Padhao

महा सुपर ग्रीन कार कर्ज स्कीम - इलेक्ट्रिक कार

वैयक्तिक वापरासाठी सध्या इलेक्ट्रिक वाहने वापरकर्त्यांमध्ये लोकप्रिय होत आहेत. तसेच वाढती प्रदूषण पातळी आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या वाढत्या धोक्याला आळा घालणे ही काळाची गरज आहे. पारंपारिक पेट्रोल/डिझेल कारपेक्षा इलेक्ट्रिक वाहनांचे (EVs) अनेक फायदे आहेत जसे की: -

  • चालवण्यासाठी स्वस्त (कमी इंधन खर्च ).
  • पर्यावरणासाठी चांगले: इको-फ्रेंडली
  • आरोग्याचे फायदे
  • सुरक्षितते मध्ये सुधारणा
  • आपली ऊर्जा सुरक्षा

वैशिष्ट्ये

  • कोणतेही प्रक्रिया शुल्क आणि दस्तऐवजीकरण शुल्क नाही
  • विद्यमान महा सुपर कार कर्ज योजनेतून व्याज दरात 0.25% सवलत.
  • जास्तीत जास्त निधी 95% पर्यंत .
  • कॉर्पोरेट क्लायंट (फर्म/कंपन्या) यांच्या साठी देखील कर्ज उपलब्ध आहे.
  • दररोज कमी होत जाणाऱ्या शिल्लकीवर व्याज आकारले जाईल.
  • कोणतेही प्री-पेमेंट/प्री-क्लोजर/पार्ट पेमेंट शुल्क नाही.
  • जलद प्रक्रिया वेळ .

S. No

विशेष

योजनेची मार्गदर्शक तत्त्वे

1

उद्देश

व्यक्तींसाठी (18 वर्षे आणि त्यावरील) / कंपन्या आणि कॉर्पोरेट संस्था यांच्या वैयक्तिक वापरासाठी (म्हणजे प्रवासी भाड्याने/फेरीसाठी नाही) नवीन इलेक्ट्रिक चार चाकी म्हणजेच कार, जीप, मल्टी युटिलिटी व्हेइकल्स (MUV), SUV इत्यादींची खरेदी साठी.

2

पात्रता

वैयक्तिक पगारदार कर्मचारी/स्वयंरोजगार व्यावसायिक /उद्योजक /कृषी/ कंपन्या आणि कॉर्पोरेट संस्था.

3

कर्जाची पात्र रक्कम

कर्जाची कमाल रक्कम: - रु 100.00 लाख

1. पगारदार व्यक्ती/पेन्शनधारकांसाठी: ‘वजावट' च्या अधीन राहून निव्वळ मासिक पगार/पेन्शन च्या 48 पट पर्यंत.

2. स्वयंरोजगार व्यावसायिकांसाठी*: 'वजावट' च्या अधीन राहून मागील 2 वर्षांच्या आयकर परताव्यावर आधारित सरासरी वार्षिक उत्पन्नाच्या 4 पट किंवा नवीनतम आयकर परताव्यावर आधारित एकूण करपात्र उत्पन्नाच्या 4 पट पर्यंत, यातील जे कमी असेल ते.  (एकूण उत्पन्न म्हणजे रोख जमा).

3. इतर व्यक्तींसाठी (उद्योजक आणि शेतकरी): 'वजावट' च्या अधीन राहून, 3 वर्षांच्या आयकर परताव्यावर आधारित सरासरी वार्षिक उत्पन्नाच्या 4 पट किंवा नवीनतम आयकर परताव्यावर आधारित एकूण करपात्र उत्पन्नाच्या 4 पट पर्यंत, यातील जे कमी असेल ते.  (एकूण उत्पन्न म्हणजे रोख जमा).

4. कॉर्पोरेट क्लायंटसाठी (कंपन्या/कंपन्या) : 'वजावट' च्या तसेच डेट सर्व्हिस कव्हरेज रेशो 1.5 पेक्षा जास्त असावा या अटींच्या अधीन राहून, 3 वर्षांच्या आयकर परताव्यावर आधारित सरासरी वार्षिक उत्पन्नाच्या 4 पट किंवा नवीनतम आयकर परताव्यावर आधारित एकूण करपात्र उत्पन्नाच्या 4 पट पर्यंत, यातील जे कमी असेल ते.

*-स्वयंरोजगार व्यावसायिकांमध्ये स्वतःची प्रॅक्टिस असलेले सीए, डॉक्टर, आर्किटेक्ट, कंपनी सेक्रेटरी, सीएमए इत्यादींचा समावेश आहे.

4

किमान वार्षिक उत्पन्न

  1. पगारदार/पेन्शनधारकांसाठी: रु. 3.00 लाख (मागील वर्षाचे उत्पन्न) –मागील किमान  2 वर्षाचा आयकर परतावा/ नियोक्त्याकडून फॉर्म 16 अनिवार्य आहे.
  2. स्वयंरोजगार व्यावसायिकांसाठी: रु.4.00 लाख (मागील वर्षाचे उत्पन्न) इतर सहाय्यक कागदपत्रांसह मागील किमान  2 वर्षाचा आयकर परतावा अनिवार्य आहे.
  3. उद्योजकांसाठी: रु.4.00 लाख (मागील वर्षाचे उत्पन्न) - इतर सहाय्यक कागदपत्रांसह मागील किमान  3 वर्षाचा आयकर परतावा अनिवार्य आहे.
  4. कृषी आणि संलग्न क्रियाकलापांमध्ये गुंतलेल्या व्यक्तींसाठी किमान वार्षिक उत्पन्न रु.4.00 लाख.
  5. कॉर्पोरेट ग्राहकांसाठी (फर्म/कंपन्या ): इतर सहाय्यक कागदपत्रांसह मागील किमान  2 वर्षाचा आयकर परतावा अनिवार्य आहे.

पती/पत्नी/वडील/आई/मुलगा/सून (यांतील कोणीही एक) यांचे उत्पन्न कर्ज आणि परतफेडीचे प्रमाण ठरवण्यासाठी सह-अर्जदार म्हणून ग्राह्य धरले जाऊ शकते.

5

मार्जिन

  1. विद्यमान/नवीन गृहकर्ज कर्जदार आणि कॉर्पोरेट पगार खातेधारकांसाठी - वाहनाच्या किंमतीच्या किमान 5% ( म्हणजे एक्स-शो रूम किंमत + आरटीओ शुल्क + विमा शुल्क).
  2. इतर व्यक्तींसाठी (व्यावसायिक आणि शेतकरी):  - वाहनाच्या किंमतीच्या किमान 10% (म्हणजे एक्स-शो रूम किंमत + आरटीओ शुल्क + विमा शुल्क)
  3. कॉर्पोरेट क्लायंटसाठी (फर्म/कंपन्या)- किमान १०% ( म्हणजे एक्स-शोरूम किंमत + आरटीओ शुल्क + विमा शुल्क)
6

परतफेड कालावधी

कमाल 84 महिने

7

व्याज दर

इथे क्लिक करा

8

वजावट

  • प्रस्तावित मासिक हप्त्यासह एकूण उत्पन्नाच्या 65% पेक्षा जास्त नसावे.
  • मागील 2 वर्षांसाठी स्टँडर्ड श्रेणीतील विद्यमान गृहनिर्माण कर्जदारांसाठी प्रस्तावित मासिक हप्त्यासह एकूण उत्पन्नाच्या 70% पेक्षा जास्त नसावे.
9

सुरक्षा

प्राथमिक सुरक्षा

  • खरेदी केलेल्या वाहनाचे हायपोथेकेशन.
  • आमचा हायपोथेकेशन चार्ज (तारण) प्रादेशिक परिवहन कार्यालय प्राधिकरणांकडे नोंदणीकृत केले पाहिजे

कोलॅटरल सुरक्षा

  • 25.00 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी - शून्य
  • 25.00 लाखांपेक्षा जास्त कर्जासाठी - बँकेच्या नावे कर्जाच्या रकमेच्या किमान 50% मूल्याच्या मूर्त सुरक्षे सह.

वाहनाची नोंदणी हिरव्या नंबर प्लेटने केली पाहिजे आणि हायपोथेकेशन चार्ज तयार केला पाहिजे.

10

प्रक्रिया शुल्क

शून्य

11

दस्तऐवजीकरण शुल्क

शून्य