Beti Bachao Beti Padhao

महा सुपर कार लोन

वैशिष्ट्ये

  • एकंदर किंमतीच्या 100% पर्यंत कर्ज रक्कम
  • कार्पोरेट ग्राहकांना (संस्था/कंपन्या) कर्जपुरवठा उपलब्ध
  • दैनंदिन कपात तत्वावर व्याजाची आकारणी
  • मुदपूर्व कर्जफेड/मुदतीआधी परतफेड/आगाऊ परतफेड यावर कोणताही आकार नाही.
  • तात्काळ कर्जमंजुरी

अ.क्र.

तपशील

योजनेची मार्गदर्शक तत्वे

1

हेतू

नव्या चारचाकी गाडीची खरेदी म्हणजे कार, जीप, बहुउपयोगी वाहने (एमयूव्ही) इत्यादी. वैयक्तिक वापरासाठी (भाड्याने देणे/प्रवासी वाहतूक यासाठी नाही) - वैयक्तिक (18 वर्षे आणि त्यापुढील)/कंपन्या आणि कार्पोरेट संस्था यांच्यासाठी.

2

पात्रता

पात्र असलेले :

  1. निवासी भारतीय 
  2. अनिवासी भारतीय (एनआरआय) किंवा भारतीय वंशाचे लोक (पीआयओ)
  3. कार्पोरेट (सार्वजनिक कंपन्या/प्रायव्हेट लिमिटेड कंपनी/एलएलपी/ट्रस्ट/सोसायटी इ.)
3

कर्जमर्यादेची पात्रता

कमाल कर्ज रकमेचा निर्णय कमाल कपातीच्या रकमेच्या आधारे घेतला जाईल.

अ. वैयक्तिक - रु. 500.00 लाख

ब. अवैयक्तिक-रु. 100.00 लाख

4

किमान वार्षिक उत्पन्न

व्यवसायाचे स्वरूप

किमान एकूण उत्पन्न

पगारदार/ निवृत्ती वेतनधारक व्यक्ती

मासिक किमान उत्पन्न / निवृत्तीवेतन

रु. 25000/- आणि अधिक

स्वयंरोजगारित व्यक्तीसाठी

रु. 3.00 लाख (गेल्या वर्षीचे उत्पन्न)

- गेल्या किमान 2 वर्षांचे आयटीआर आणि त्या संदर्भातील कागदपत्रे अनिवार्य.

उद्योजक/शेतकरी

रु. 4.00 लाख (गतवर्षीचे उत्पन्न)

गेल्या किमान दोन वर्षांचे आयटीआर-संबंधित कागदपत्रांसह असणे अनिवार्य.

कार्पोरेट (पब्लिक लिमिटेड कंपनी/प्रायव्हेट लिमिटेड कंपनी इ.)

संस्था - म्हणजे वैयक्तिक मालकीच्या संस्था/भागिदारी/एलएलपी/ट्रस्ट/सोसायटी

  • एकंदर वास्तव मालमत्ता (टीएनडब्ल्यू) - गेल्या किमान दोन वर्षांचे- अपेक्षित कर्ज रकमेच्या किमान 5 पट
  • कंपनीज/फर्मस्‌‍ ज्यांचा रेटिंग सीएमआर 1 ते सीएमआर 5 एवढा आहे किंवा एक्स्टर्नल रेटिंग बीबीबी आणि त्यापुढे

5

मार्जिन

अ. गृहकर्ज घेतलेल्या विद्यमान कर्जदारांसाठी वाहनाच्या अंतिम (रस्त्यावर) किंमतीच्या - नाही (शून्य)

ब. इतरांसाठी - वाहनाच्या अंतिम (रस्त्यावर) किंमतीच्या किमान 10%

रस्त्यावरील किंमत यामध्ये शोरूममधील किंमत, रोड टॅक्स, रजिस्ट्रेशनचा खर्च आणि विमा (एक वर्ष किंवा ३ वर्ष) सुट्या भागांच्या किंमती व्यतिरिक्त.

6

परतफेडीचा कालावधी

कमाल 84 महिने

7

व्याजाचा दर

येथे क्लिक करा

8

वजावट

पगारदार - एकूण मासिक उत्पन्नाच्या 80% पर्यंत.

9

तारण

खरेदी केलेल्या वाहनाचे गहाणतारण

10

प्रक्रिया शुल्क

कर्ज रकमेच्या 0.25% (कमाल रु. 15,000/-)