Beti Bachao Beti Padhao

शैक्षणिक कर्जासाठी व्याज अनुदान

१. केंद्रिय विभाग व्याज अनुदान योजना :

त्यांच्या पालक/कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न ४.५० लाखपर्यंत आहे. त्यांच्यासाठी केंद्र सरकारच्या मानव संसाधन मंत्रालयाने तांत्रिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आयबीए मॉडेल एज्युकेशन लोन स्कीम अंतर्गत मुदत वाढीच्या कालावधीसाठी सन २००९-१० च्या शैक्षणिक वर्षापासून व्याज अनुदान जाहीर करण्यात आले आहे.

पात्र विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र देण्यासाठी प्राधिकृत असलेल्या प्राधीकरणाकडून प्राप्त उत्पन्नाच्या दाखल्यास बँक ऑफ महाराष्ट्रच्या संबधित शाखेशी संपर्क साधावा.

पात्रता

अ - आयबीए मॉडेल कर्ज योजनेअंतर्गत घेतलेले शैक्षणिक कर्ज.

ब - ज्या विद्यार्थांच्या पाल्यांचे वार्षिक उत्पन्न रू. ४.५ लाखांपर्यंत आहे.

क - ज्या विद्यार्थांची नोंदणी फक्त एनए एसी मान्यताप्राप्त व्यावसायिक तांत्रिक कार्यक्रम जे एनबीए किंवा सेंट्रल फंड टेक्नीकल इन्स्टीट्यूशन (सीएफटीएस) यांच्याकडून मान्यता असलेल्या व्यावसायिक/तांत्रिक अभ्यासक्रमासाठी नोंदविण्यात आलेले विद्यार्थी ज्या व्यावसायिक संस्था/ अभ्यासक्रम जे एनएएसी किंवा एनबीए यात समाविष्ट नाही अशांना संबधित नियामक संस्थाकडून म्हणजे मेडिकल कौन्सिल ऑफ इडिंया यांची मान्यता वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी आवश्यक, नर्सिंग कोर्सेससाठी नर्सिंग कौन्सिल उपक्रम इंडिया आणि कायदा अभ्यासक्रमांसाठी वार कौन्सिलची मान्यता आवश्यक.

ड - प्रवेश फक्त यूजी, पी.जी मार्फत, त्याचप्रमाणे इंटिग्रेटेड कोर्सेस (पदवीधर + पदव्युत्तर यासाठभ हा लागू)

२. पढो परदेश- अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी विदेशात शिक्षण घेण्याकरिता व्याज अनुदानाची योजना-

  • या योजनेत नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज ॲक्ट १९९२ च्या कलम २ (सी) अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या निकषाअंतर्गत निश्चित करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना व्याज अनुदान देण्याची मध्यवर्ती विभाग योजना आहे. या योजनेअंतर्गत विदेशातील मास्टर्स, एमफिल/पीएचडी दर्जाच्या अभ्यासक्रमांकरिता शैक्षणिक कर्जाच्या व्याजावर अनुदान देण्यात येते.
पात्रता:-
  • विद्यार्थ्याने मास्टर्स, एमफिल किंवा पीएचडी दर्जाच्या मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांसाठी विदेशातील संस्थामध्ये प्रवशे घेतलेला असावा
  • नोकरदार विद्यार्थी किंवा तो बरोजगार असल्यास त्याचे/तिचे आईवडील/पालक यांचे वार्षिक उत्पन्न रु. ६.०० लाखांपेक्षा अधिक असू नये.
 

पात्र विद्यार्थ्यांनी कोणत्याही अधिक तपशिलासाठी संबधित प्राधिकृत अधिकाऱ्याकडून प्राप्त केलेल्या उत्पन्नाच्या दाखल्यासह बँक ऑफ महाराष्ट्राच्या संबधित शाखेशी संपर्क साधावा

३. अन्य मागासवर्गीय (ओबीसीज) आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय (ईबीसीज) विद्यार्थ्यांसाठी विदेशात शिक्षण घेण्याकरिता डॉ. आंबेडकर सेंट्रल सेक्टर योजना

या योजनेअंतर्गत अन्य मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना विदेशात अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक कर्जावरील व्याजासाठी अनुदान देण्यात येते.

ही सेंट्रल सेक्टर स्कीम असून त्याद्वारे ओबीसी आणि ईबीसी विद्यार्थ्यांना विदेशात मास्टर्स, एमफिल आणि पीएचडी दर्जाचे शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक कर्जावरील व्याजाचे अनुदान प्राप्त करून देते.

पात्रता

विद्यार्थांनी मान्यताप्राप्त मास्टर्स, एमफिल आणि पीएचडी कोर्सेससाठी प्रवेश प्राप्त केलेला असावा.

उत्पन्न मर्यादा

अ - ओबीसी विद्यार्थांसाठी नोकरदार विद्यार्थ्यांचे आणि बेरोजगार विद्यार्थ्यांसाठी त्यांचे आईवडील/पालक यांचे वार्षिक उत्पन्न रु. ८.०० लाखांपेक्षा अधिक असू नये.

ब - ईबीसी विद्यार्थ्यांसाठी रु. २.५० लाखांपेक्षा अधिक असू नये.