Beti Bachao Beti Padhao

FX रिटेल ( विदेशी मुद्रा व्यवहार –रिटेल )

वैशिष्ट्ये:

  • भारतीय रिझर्व बँकेने दिनांक 20 जून 2019 रोजी जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे बँकांनी आपल्या ग्राहकांसाठी विदेशी मुद्रा विनिमय व्यवहारासाठी भारतीय निकासी महामंडळाच्या “ FX-Retail” या रिटेल ऑनलाईन मंचावरील विदेशी मुद्रा विनिमय उपलब्ध करून देण्याविषयी सूचित केले होते.
  • सदर मंच दिनांक 5 ऑगस्ट 2019 रोजी कार्यान्वित करण्यात आला.
  • सदर मंचावर विदेशी मुद्रेचे सत्कालिक दर उपलब्ध असल्यामुळे व ग्राहकांना त्याबाबत थेट अभिगम असल्यामुळे आपल्या उत्पादनांचे मुल्यांकन प्रक्रियेत पारदर्शकता ठेवणे शक्य झाले आहे.
  • बँक ऑफ महाराष्ट्र आपल्या ( ब) वर्गवारी असलेल्या सर्व शाखांच्य माध्यमातून या विदेशी मुद्रा विनिमय मंचावरील ऑनलाईन सेवा ग्राहकांना उपलब्ध करून देत आहे.
  • सदर सुविधा देऊ करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र कोणतेही शुल्क आकारत नाही व प्रत्यक्ष व्यवहार करतानाच अन्य लागू शुल्क / मुल्यंतर यांची रक्कम प्रदर्शित होते.
  • भारतीय निकासी महामंडळ आपले शुल्क खालील संकेतस्थळावर प्रदर्शित करते https://www.ccilindia.com/AboutUs/Documents/Schedule of Fees and Charges.pdf

विदेशी मुद्रा व्यवहार –रिटेलची वैशिष्ट्ये:

  • भारतीय निकासी महामंडळाच्या अमेरिकी डॉलर – भारतीय रुपये अंतर बँक दर पाहून अनामिक बहुस्तरीय वापरकर्ता अनुरूपन प्रणाली.
  • महाजाल आधारित प्रणालीवर कुठेही प्राधिकृत अभिगम.
  • आज भारतीय रुपये भरून ग्राहक आज, उद्या व परवासाठी अमेरिकन डॉलरची खरेदी किंवा विक्री करू शकतात.
  • व्यवहारांची एकूण रक्कम ही प्रत्येक बँकेने विहित केलेल्या ( रक्कम, वर्गवारी व मुदत निहाय ) मर्यादेच्या अधीन असेल.
  • अंतर बँक दारावरून विनिमय दुरावा व अदलाबदल शुल्क घटकीकरण केल्यावर निव्वळ दराचे वियोजन तपशील ग्राहकांना पुरविण्यात येतील.
  • ग्राहकांना व्यवहार निहाय तपासणीचे सूत्र उपलब्ध असेल.

नोंदणी प्रक्रिया:

  • बँक ऑफ महाराष्ट्रची संबंधी बँक, (ब) वर्गवारी शाखेची विनिमय शाखा व ग्राहकांचे खाते असलेली बँकेची शाखा ही गृह शाखा म्हणून निवड करून ग्राहकांनी आवश्यक त्या तपशिलासह https://www.fxretail.co.in या संकेतस्थळावर आपला अर्ज सादर करावा.
  • ग्राहकाने अर्जासह उपरोक्त अर्जाची स्वाक्षरीत छापील प्रत आपले खाते असलेल्या शाखेत सादर करावयाची आहे.
  • यशस्वीरीत्या संक्रीयन झाल्यावर आपल्या इ मेल / भ्रमणध्वनी द्वारे व प्राप्त संकेतशब्दाचा ( संकेतशब्द विसर जोडणी ) वापर करून ग्राहक विदेशी मुद्रा विनिमय – रिटेल संकेतस्थळावर लॉग इन होऊ शकतात.

व्यवहाराची प्रक्रिया:

  • लॉग इन केल्यावर सर्वप्रथम ग्राहकांनी मंचाच्या उजव्या बाजूला असलेल्या ऊर्ध्व कोपऱ्यात असलेल्या प्रश्नचिन्हाच्या माद्यमातून उपलब्ध असलेल्या विदेशी मुद्रा विनिमय – रिटेल पुस्तिकेचा अभ्यास करून मगच पुढील कोणताही व्यवहार करावा.
  • (एखाद्या व्यवहारासाठी आवश्यक सर्व दस्तऐवज सादर करून झाल्यावर ) ( ब) वर्गवारी शाखेकडून व्यवहार करण्याची परवानगी प्राप्त झाल्यावर ग्राहक उपरोक्त पुस्तिकेत नमूद टप्प्यांनुसार विदेशी मुद्रेचे आरक्षण करू शकेल. त्यानंतर विदेशी मुद्रा विनिमय – रिटेलच्या खिडकीत उपलब्ध असलेले व्यवहाराचे तिकीट ग्राहकाने ( ब) वर्गवारी शाखेकडे अग्रेषित करणे आवश्यक आहे.