Beti Bachao Beti Padhao

केंद्र सरकार पेन्शनर कॉर्नर

केंन्द्रीय पेन्शन

 • निवृत्ती वेतनधारकांच्या गरजा आणि आवश्यकता लक्षात घेऊन निवृत्ती वेतन बचत खाते तयार केले गेले आहे. खालील व्यक्ती बचत खाते उघडण्यास पात्र आहेत.
  • सर्व केंद्र सरकारी विभाग आणि नागरी मंत्रालयातील सर्व कर्मचारी जे केंद्रीय पेन्शन लेखा कार्यालय (सीपीएओ) द्वारा संचालित केंद्र सरकारच्या नागरी निवृत्ती वेतन योजनांतर्गत येतात.
  • संरक्षण विभागातील कर्मचारी
  • रेल्वे कर्मचारी
  • दूरसंचार कर्मचारी

निवृत्ती वेतन बचत खाती एकल किंवा संयुक्त बँक खाती (जोडीदारासह) असू शकतात.

फायदे:

 • पेन्शन प्रदान करणाऱ्या शाखेतून पेन्शन स्लिप.
 • पेन्शन पेमेंटसाठी मोबाइल फोनवर एसएमएस अलर्ट.
 • शाखेतून निवृत्ती वेतनाचे वार्षिक विवरण.
 • बँकेच्या कोणत्याही शाखेत हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा.
 • जलदगती तक्रार निवारण प्रणाली.
 • शाखेत फॉर्म १५(जी)/१५(एच)ची स्वीकृती.
 • आधार कर्जाची सुविधा.
 • डेबिट कार्ड/चेक बुक/ नेट बँकिंग सुविधा उपलब्ध आहे.

प्रकिया​:

 • सेवानिवृत्तीपूर्वी कर्मचाऱ्यास बँकेच्या कोणत्याही शाखेत उघडावे लागते आणि ज्या खात्यातून तो/ती सेवानिवृत्त होत आहे त्या विभागाकडे खाते क्रमांक द्यावा लागतो.
 • खाते उघडताना कर्मचाऱ्यांना पॅन, आधार कार्ड, मोबाइल नंबर इत्यादी केवायसी नियमांचे पालन करावे लागते.
 • त्याला/तिला पेन्शन पेपरमध्ये खात्याचा तपशील भरावा लागेल.
 • संबंधित विभाग पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ) तयार करतो ज्यामध्ये खाते सर्व तपशील जसे की, पॅन क्रमांक, आधार क्रमांक यासह निवृत्ती वेतनधारकांची सर्व माहिती समाविष्ट केली जाते.
 • पीपीओ मध्यवर्ती पेन्शन प्रोसेसिंग सेल (सीपीपीसी) कडे पाठविला जातो, पुणे येथील निवृत्ती वेतन धारकांना कौटुंबिक पेन्शनच्या बाबतीत प्रारभिंक प्रक्रिया जीवन प्रमाणपत्र, रोजगार नसल्याचा दाखला आणि फॅमिली पेन्शनच्या संदर्भात विवाहित नसलेले प्रमाणपत्र सादर करणे यासारख्या प्रारंभिक औपचारिकता पूर्ण कराव्या लागतात.
 • पेन्शन महिन्याच्या शेवटच्या ४ कार्यालयीन दिवसात जमा केले जाईल.

जीवन प्रमाणपत्र सादर करणे

निवृत्ती वेतनधारक त्याला/तिला स्वत:चे हयातीचे प्रमाणपत्र बँकेच्या कोणत्याही शाखेत प्रत्यक्ष किंवा डिजिटल स्वरूपात https://jeevanpramaan.gov.in/ मार्फत सादर करणे आवश्यक आहे जेणेकरून बँकेला नियमितपणे या खात्यात पेन्शन भरता येईल.

केंद्रीय निवृत्ती वेतनाशी संबंधित समस्या तक्रारींसाठी नोडल धिकारी

मनीष भालेराव

दुसरा मजला, सेंट्रल पेन्शन प्रोसेसिंग सेंटर (सीपीपीसी)

बँक ऑफ महाराष्ट्र

बाजीराव रोड पुणे.

020-24467937/938

bom1407@mahabank.co.in

पेन्शन स्लिप तयार करण्यासाठी लिंक