बीओएम प्रो बिझ चालू खाते
अ. क्र. | तपशील | बीओएम प्रो बिझ - प्राईम सरासरी तिमाही शिल्लक (एक्यूबी) = Rs. 25000/- | बीओएम प्रो बिझ - सुप्रीम सरासरी तिमाही शिल्लक एक्यूबी) = Rs. 50000/- |
---|---|---|---|
1 | पात्रता | सर्व व्यक्ती / संस्था / भागीदारी / व्यापारी / व्यावसायिकांसह प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सध्या अस्तित्वात असलेल्या नियामक मार्गदर्शक सूचना आणि बँकेचे संदर्भ क्र. एएक्स१/ ऑपरेशनल / मास्टर सर्क्युलर – कस्टमर ऑन बोर्डिंग / 2024-25 / सर्क्यु. नं. 17 दि. 06/07/2024 अनुसार पटलावर असलेले ग्राहक | नोंदणीकृत व्यावसायिक व्यक्ती संस्था / भागीदारी / पुढील व्यवसायाशी संबंधित प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या
सध्या अस्तित्वात असलेल्या नियामक मार्गदर्शक सूचना आणि बँकेचे संदर्भ क्र. एएक्स१/ ऑपरेशनल / मास्टर सर्क्युलर – कस्टमर ऑन बोर्डिंग / 2024-25 / सर्क्यु. नं. 17 दि. 06/07/2024 अनुसार पटलावर असलेले ग्राहक |
2 | किमान एक्यूबी (सरासरी तिमाही शिल्लक) | रु. 25000/- प्रारंभी शून्य रकमेने खाते उघडता येईल. | रु. 50000/- प्रारंभी शून्य रकमेने खाते उघडता येईल. |
3 | सरासरी तिमाही किमान शिल्लक नसल्यास (एक्यूबी) पडणारा आकार | प्रति तिमाही | प्रति तिमाही |
4 | धनादेश सुविधा | दरसाल 50 धनादेश विनामूल्य | दरसाल 75 धनादेश विनामूल्य |
5 | डेबिट कार्ड | रुपे प्लॅटिनम डेबिट कार्ड या कार्डचा वापर देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी करता येईल. टीप : डेबिट कार्ड व्यक्तीगत स्वरूपात तसेच वैयक्तिक मालकीच्या संस्थांच्या मालकाच्या बाबतीत देण्यात येईल. | रुपे सिलेक्ट डेबिट कार्ड या कार्डचा वापर देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी करता येईल. टीप : डेबिट कार्ड व्यक्तीगत स्वरूपात तसेच वैयक्तिक मालकीच्या संस्थांच्या मालकाच्या बाबतीत देण्यात येईल. |
6 | डेबिट कार्डचे मूल्य | विनामूल्य | विनामूल्य |
7 | डेबिट कार्डसाठी वार्षिक देखभाल खर्च | नाही | नाही |
8 | एटीएमवरील व्यवहारांची संख्या | बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएमवर- अमर्यादित व्यवहार (सहा मेट्रोसिटी – जसे की मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगलोर आणि हैदराबाद व्यतिरिक्त जेथे फक्त 3 व्यवहार – वित्तीय आणि अवित्तीय हे विनामूल्य आहेत. महिन्यातील 6 व्या व्यवहारानंतर | ऑन-अस : अमर्यादित ऑफ-अस : अमर्यादित |
9 | कमाल व्यवहार मर्यादा | एटीएममधून रोख रक्कम काढणे – एका दिवसात रु. 1.50 लाखापर्यंत पीओएस / ई-कॉमर्स प्रतिदिन रु. 3 लाखांपर्यंत | एटीएममधून रोख रक्कम काढणे – एका दिवसात रु. 1.50 लाखापर्यंत पीओएस / ई-कॉमर्स प्रतिदिन रु. 5 लाखांपर्यंत |
10 | एनईएफटी /आरटीजीएस | ऑनलाईन : विनामूल्य | ऑनलाईन : विनामूल्य |
11 | एसएमएस आकार | विनामूल्य | विनामूल्य |
12 | लॉकर | सध्याच्या दराने लॉकरचे प्राधान्याने वाटप | सध्याच्या दराने लॉकरचे प्राधान्याने वाटप |
13 | अपघाती मृत्यूबाबत वैयक्तिक विमा संरक्षण (रुपे सिलेक्ट / प्लॅटिनम डेबिट कार्डवर) | वैयक्तिक विमा आणि संपूर्ण अपंगत्व विमा कवच रु. 2 लाख टीप – कृपया याची नोंद घ्यावी की, वर नमूद करण्यात आलेले लाभ हे एनपीसीआय यांच्याकडून घेण्यात आलेल्या आढाव्यानुसार करण्यात आलेल्या / मागे घेण्यात आलेल्या तरतुदीच्या अधीन आहेत. डेबिट कार्ड फक्त वैयक्तिक आणि मालकीच्या संस्थांच्या मालकाच्या नावे जारी करण्यात येईल. | वैयक्तिक विमा आणि संपूर्ण अपंगत्व विमा कवच रु. 10 लाख टीप – कृपया याची नोंद घ्यावी की, वर नमूद करण्यात आलेले लाभ हे एनपीसीआय यांच्याकडून घेण्यात आलेल्या आढाव्यानुसार करण्यात आलेल्या / मागे घेण्यात आलेल्या तरतुदीच्या अधीन आहेत. डेबिट कार्ड फक्त वैयक्तिक आणि मालकीच्या संस्थांच्या मालकाच्या नावे जारी करण्यात येईल. |
14 | रुपे सिलेक्ट / प्लॅटिनम कार्डवर विनामूल्य सुविधा |
टीप : वर नमूद करण्यात आलेले लाभ हे एनपीसीएल यांच्याकडून वेळोवेळी करण्यात आलेली दुरुस्ती / मागे घेण्यात आलेल्या तरतुदी यांच्या अधीन आहेत. |
टीप : वर नमूद करण्यात आलेले लाभ हे एनपीसीएल यांच्याकडून वेळोवेळी करण्यात आलेली दुरुस्ती / मागे घेण्यात आलेल्या तरतुदी यांच्या अधीन आहेत. |
15 | मासिक स्टेटमेंट | बँकेच्या शाखेत विनामूल्य ई-मेल, मोबाईल आणि नेट बँकिंग आणि महिन्यात एकदा स्टेटमेंट | बँकेच्या शाखेत विनामूल्य ई-मेल, मोबाईल आणि नेट बँकिंग आणि महिन्यात एकदा स्टेटमेंट |
16 | अन्य सेवांसाठी आकार | वर नमूद करण्यात आलेल्या नाहीत अशा अन्य सर्व सेवा जसे की लेजर फोलिओ चार्जेस, चार्जेस फॉर अकाऊंट स्टेटमेंट डीडी इन्शुअरन्स इत्यादी त्या त्या वेळी लागू असलेल्या दराने आकारण्यात येईल. | वर नमूद करण्यात आलेल्या नाहीत अशा अन्य सर्व सेवा जसे की लेजर फोलिओ चार्जेस, डीडी इन्शुअरन्स इत्यादी त्या त्या वेळी लागू असलेल्या दराने आकारण्यात येईल. |
टीप : अन्य चालू खाती बीओएम प्रो बिझ प्राईम / बीओएम प्रो बिझ सुप्रीममध्ये परावर्तीत करता येतील. मात्र हा निर्णय त्या योजनेसाठी असलेले पात्रता निकष पूर्ण करण्याच्या अधीन असेल. |
वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न
1. बीओएम प्रो बिझ चालू खाते म्हणजे काय ?
वेगवेगळे उद्योजक आणि व्यावसायिक यांच्या बँकिंगविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आलेले विशेष असे प्रो बिझ चालू खाते आहे.
2. बीओएम प्रो बिझ चालू खाती किती प्रकारची आहेत ?
बीओएम प्रो बिझ चालू खाती दोन प्रकारची आहेत:
- बीओएम प्रो बिझ - प्राईम : सर्वसाधारण व्यावसायिक वापरासाठी सरासरी तिमाही शिल्लक (एक्यूबी) रु. 25,000.
- बीओएम प्रो बिझ - सुप्रीम : अधिक सरासरी तिमाही शिल्लक (एक्यूबी) रु. 50,000 एवढी असेल त्यांच्यासाठी
3. या खात्यांसाठी प्रॉडक्ट कोड कोणते आहेत ?
बीओएम प्रो बिझ - प्राईम:
- व्यक्तिगत : 1045-1401
- अ-व्यक्तिगत : 1045-2401
बीओएम प्रो बिझ - सुप्रीम:
- व्यक्तिगत : 1046-1401
- अ-व्यक्तिगत : 1046-2401
4. बीओएम प्रो बिझ – प्राईम खाते उघडण्यासाठी कोण पात्र असेल ?
बीओएम प्रो बिझ – प्राईम खाते पुढीलप्रमाणे उपलब्ध आहे :
- सर्व व्यक्ती
- मालकी हक्क असलेल्या संस्था
- भागीदारी संस्था
- व्यापारी
- प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या
- व्यावसायिक
5. बीओएम प्रो बिझ – सुप्रीम खाते उघडण्यासाठी कोण पात्र असेल ?
बीओएम प्रो बिझ – सुप्रीम खाते हे विशेष करून नोंदणीकृत व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती आणि पुढीलप्रमाणे व्यावसायिक यांच्यासाठी आहे :
- डॉक्टर्स
- चार्टर्ड अकौंटंटस्
- ॲडव्होकेटस
- आर्किटेक्टस
- कंपनी सेक्रेटरीज
- कॉस्ट अकौंटंटस
6. किती किमान सरासरी तिमाही शिल्लक (एक्यूबी) आवश्यक आहे ?
- बीओएम प्रो बिझ – प्राईम : Rs. 25,000
- बीओएम प्रो बिझ – सुप्रीम : Rs. 50,000
7. खाते उघडण्यासाठी सुरुवातीला काही किमान रक्कम जमा करावी लागते का ?
नाही , बीओएम प्रो बिझ – प्राई आणि बीओएम प्रो बिझ – सुप्रीम खाते सुरुवातीला शून्य रक्कम जमा करून सुरू करता येईल.
8. किमान तिमाही सरासरी शिल्लक (एक्यूबी) नसल्यास भरावा लागणारा आकार ?
- बीओएम प्रो बिझ – प्राईम : रु. 1,500 प्रति तिमाही
- बीओएम प्रो बिझ – सुप्रीम : रु.. 2,000 प्रति तिमाही
9. बीओएम प्रो बिझ खाते उघडण्यासाठी ग्राहकांनी कशा प्रकारे अर्ज करावा ?
बीओएम प्रो बिझ पैकी कोणतेही खाते उघडण्यासाठी ग्राहकांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या नजीकच्या शाखेला भेट द्यावी.
10. दरमहा धनादेशांच्या किती मोफत प्रती मिळतात ?
- बीओएम प्रो बिझ – प्राईम : 50 धनादेश प्रति दरसाल मोफत
- बीओएम प्रो बिझ – सुप्रीम : 75 धनादेश प्रति दरसाल मोफत
11. इलेक्ट्रॉनिक व्यवहार (एनईएफटी/आरटीजीएस/एमपीएस) करिता किती आकार ?
ऑनलाईन एनईएफटी/आरटीजीएस पेमेंट विनामूल्य आहेत.
बँकेच्या शाखेमार्फत एनईएफटी/आरटीजीएस सुविधा वापरल्यास किती आकार पडतो याची माहिती बँकेच्या कॉर्पोरेट वेबसाईटवर उपलब्ध आहे.
12. बीओएम प्रो बिझ चालू खात्यावर कोणत्या प्रकारचे डेबिट कार्ड जारी करण्यात येते ?
- बीओएम प्रो बिझ – प्राईम : रुपे प्लॅटिनम डेबिट कार्ड
- बीओएम प्रो बिझ – सुप्रीम : रुपे सिलेक्ट डेबिट कार्ड
13. ऑन-अस आणि ऑफ-अस एटीएम ट्रान्झॅक्शन म्हणजे काय ?
- ऑन-अस – बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएमवर करण्यात आलेले ट्रान्झॅक्शन
- ऑफ-अस – अन्य बँकांच्या एटीएमवर करण्यात आलेले ट्रान्झॅक्शन
14. वैयक्तिक अपघाती मृत्यू विमा कवच प्राप्त करण्यासाठी कोणत्या अटी आहेत ?
वर नमूद करण्यात आलेले लाभ एनपीसीएलच्या मार्गदर्शक सूचनांमधील सुधारणा / मागे घेण्यात आलेल्या सूचना यांच्या अधीन आहेत.
15. सध्या सुरू असलेले चालू खाते बीओएम प्रो बिझ चालू खात्यात परावर्तित करता येईल का ?
होय , अन्य कोणत्याही चालू खात्याचे बीओएम प्रो बिझ चालू खात्यात परावर्तित करता येईल, मात्र ते योजनेच्या संदर्भातील पात्रतांची पूर्तता करण्याच्या अधीन राहील.