श्री.निधू सक्सेना
व्यवस्थापकीय संचालक मुख्य कार्यकारी अधिकारी
श्री. आशीष पांडे
कार्यकारी संचालक
श्री. आशीष पांडे
श्री आशीष पाण्डेय यांची प्रगतीशील व्यावसायिक कारकीर्द 26 वर्षांहून अधिक काळ आहे आणि या काळात त्यांनी क्रेडिट, क्रेडिट मॉनिटरिंग, ट्रेझरी आणि मर्चंट बँकिंग, परदेशी व्यवहार आणि संयुक्त उपक्रम, विपणन आणि ग्राहक संबंध आणि बँकिंग ऑपरेशन्स यासारख्या वैविध्यपूर्ण जबाबदाऱ्या हाताळल्या आहेत.
श्री पाण्डेय हे मॅकेनिकल अभियंता (ऑनर्स) असून त्यांनी वित्त आणि विपणन या विषयात स्पेशलायझेशन घेऊन व्यवस्थापनात पदव्युत्तर शिक्षण (ऑनर्स) घेतले आहे. ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकर्सचे सर्टिफाईड असोसिएट आहेत आणि त्यांनी विमा (जीवन आणि नॉन-लाइफ दोन्ही), म्युच्युअल फंड आणि डी-मॅट ऑपरेशन्समध्ये एनएसईचे सर्टिफिकेशन मिळवले आहे. त्यांनी आयआयएम बंगलोर मधून एक्झिक्युटिव्ह लीडरशिपचा कोर्स देखील केला आहे.त्यांनी आयआयएम, रोहतक द्वारे आयोजित ‘स्ट्रॅटेजिक डिजिटल मार्केटिंग आणि अॅनालिटिक्स’ नावाचा ऑनलाइन कार्यकारी शिक्षण कार्यक्रम देखील केला आहे.त्यांनी हार्वर्ड बिझनेस पब्लिशिंगच्या सहकार्याने एगॉन झेहेंडरचा डायरेक्टर्स डेव्हलपमेंट प्रोग्राम 2023 देखील पूर्ण केला
श्री पाण्डेय यांनी त्यांच्या बँकिंग कारकीर्दीची सुरुवात कॉर्पोरेशन बँकेच्या इंडस्ट्रियल फायनान्स शाखा, मुंबई येथून केली आणि नंतर त्यांनी त्या बँकेच्या गुंतवणूक आणि आंतरराष्ट्रीय बँकिंग विभाग, मुंबई येथे काम पहिले. युनियन बँक ऑफ इंडियामधील त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात ते बँकेच्या विमा आणि म्युच्युअल फंड व्यवसायाची स्थापना करणाऱ्या टीमचे प्रकल्प व्यवस्थापक होते.
त्यांनी पुढे बँकेच्या इंडस्ट्रियल फायनान्स शाखा, मुंबई येथे काम केले आहे आणि बँकेच्या SARAL (विशेष क्रेडिट प्रोसेसिंग सेल) चे प्रमुख म्हणून काम केले. त्या नंतर त्यांनी बँकेच्या अध्यक्षांच्या सचिवालयाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. पुढे त्यांनी राजस्थान राज्याचे प्रादेशिक प्रमुख (उपमहाव्यवस्थापक), जयपूर म्हणून नेतृत्व केले आणि सर्व व्यवसायांची सर्वांगीण कामगिरी केली.
पुढे महाव्यवस्थापक पदावर पदोन्नती झाल्यावर त्यांनी बँकेच्या क्रेडिट मॉनिटरिंग आणि रिस्ट्रक्चरिंग विभागाचे प्रमुख म्हणून भूमिका स्वीकारली ज्या दरम्यान त्यांनी डेटा ऍनालिटीक्स, प्रेडिक्टिव्ह मॉडेलिंग, रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन आणि मशीन लर्निंग या सारखे अद्ययावत तंत्रज्ञान तैनात करून बँकेच्या क्रेडिट पोर्टफोलिओच्या देखरेख आणि व्यवस्थापनाच्या बाबतीत संपूर्ण फेरबदल केला.
श्री पाण्डेय यांनी मुख्य महाव्यवस्थापक या पदावर बढती झाल्यावर एकत्रित संस्थेचे मुख्य ऑपरेशन्स ऑफिसर (सीओओ) म्हणून आव्हानात्मक भूमिका स्वीकारली. या दरम्यान विविध प्रक्रियांचे नवीनीकरण, एकत्रीकरण, ऑटोमेशन आणि डिजिटायझेशन या सारख्या जबाबदाऱ्या त्यांनी पहिल्या. या कालावधीत त्यांनी व्हॉट्सऍप बँकिंग,
ई-नामांकन, ऑनलाइन डेथ क्लेम सेटलमेंट पोर्टल, चेक बुक ट्रॅकिंग, चर्न मॉडेल (कासा डॉर्मनसी चे आगाऊ विश्लेषण), व्हिडिओ केवायसी, रोबोटिक प्रक्रिया ऑटोमेशन डोअर स्टेप बँकिंगची, डिजिटल दस्तऐवज, डिजी कनेक्ट शाखा (डिजिटल आणि कॅशलेस), माय डायरी पोर्टल (सर्व डेटा गरजांसाठी बँकेचे इंट्रानेट पोर्टल), सकारात्मक वेतन प्रणाली, स्वयंचलित 360 डिग्री खाते विवरण आणि इतर अनेक नवीन तांत्रिक संकल्पनांची अंमलबजावणी करणाऱ्या टीमचे नेतृत्व केले.
बँकेचे नुकतेच झालेले विलीनीकरण तसेच डिजिटायझेशन पाहणाऱ्या बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापन टीमचे श्री पाण्डेय हे प्रमुख घटक होते. ते यापूर्वी इंडियन बँक असोसिएशन संचालित पीएसबी अलायन्स प्रा.लि. च्या बोर्डावर नामनिर्देशित संचालक होते.
श्री आशीष पाण्डेय हे दि. 31.12.2021 रोजी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये कार्यकारी संचालक पदावर रुजू झाले. त्याचबरोबर सध्या ते द महाराष्ट एक्झिक्युटर अँड ट्रस्टी कं लि. या बँक ऑफ महाराष्ट्रची पूर्ण मालकीच्या उपकंपनी असलेल्या संस्थेचे अध्यक्ष देखील आहेत.
श्री. रोहित ऋषी
कार्यकारी संचालक
श्री. रोहित ऋषी
श्री रोहित ऋषी यांनी बी.टेक. (टेक्सटाईल), एमबीए (फायनान्स), आणि सीएआयआयबी या पदव्या धारण केलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी आयटी आणि सायबर सिक्युरिटीमध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम देखील पूर्ण केला आहे.
त्यांनी 05.07.1995 रोजी औद्योगिक विकास अधिकारी म्हणून आपली बँकिंग कारकीर्द सुरू केली आणि आता त्यांना बँकिंगच्या विविध क्षेत्रात काम करण्याचा 28 वर्षांपेक्षा जास्त अनुभव प्राप्त केला आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी बँकिंग मधील अनेक प्रमुख कार्यामध्ये, विविध पदांवर काम पाहिले, ज्यामध्ये प्रामुख्याने औद्योगिक विकास कार्यालय, एजीएम एमएसएमई/कॉर्पोरेट कार्यालय, इंडियन बँक, चेन्नई, बँकेच्या नवी दिल्लीतील मुख्य शाखेचे प्रमुख; डीजीएम (कॉर्पोरेट शाखा, नवी दिल्ली), बेंगळुरू, मुंबई आणि दिल्ली येथे एफजीएम पदाचा समावेश आहे. महाव्यवस्थापक म्हणून त्यांनी अलाहाबाद बँकेचे इंडियन बँकेत विलीनीकरण करण्यात सक्रिय सहभाग घेतला.
त्यांच्या प्रमुख कामगिरीमध्ये खालील समाविष्ट आहे: रु. 11000 कोटीच्या सरासरी शाखा व्यवसायासह कॉर्पोरेट क्रेडिटचे जमवाजमव आणि देखरेख. सुमारे रु. 25,000 कोटी व्यवसाय असलेल्या बँकेच्या सर्वात मोठ्या शाखेचा एकूण व्यवसाय विकास, देखरेख आणि शाखा प्रशासन. एमएसएमई आणि मिड कॉर्पोरेट क्षेत्राच्या वाढीसाठी आणि देखरेखीसाठी धोरण तयार करणे, उत्पादन विकास, एमएसएमई आणि मिड कॉर्पोरेट सेक्टरची स्थापना, एमएसएमई क्षेत्रातील आरबीआय, भारत सरकार यांनी दिलेले लक्ष्य सध्या करणे. मिड कॉर्पोरेट वर्टिकल मध्ये आणलेली कलाटणी. एफजीएम म्हणून काम पाहताना,उल्लेखनीय वसुलीबरोबरच आरएएम आणि कासा मधील वाढ.
एक गाढे अभ्यासक म्हणून त्यांनी फ्रँकफर्ट स्कूल ऑफ फायनान्स अँड मॅनेजमेंट, एनआयबीएम पुणे, आयआयएम बेंगळुरू (एफएसआयबी द्वारे आयोजित) तसेच ईडीआय, अहमदाबाद येथे विविध प्रशिक्षण कार्यक्रम आणि कार्यशाळांमध्ये सहभाग घेतला आहे.
श्री रोहित ऋषी हे 1 नोव्हेंबर 2023 रोजी कार्यकारी संचालक म्हणून बँक ऑफ महाराष्ट्र च्या सेवेत रुजू झाले .
डॉ अभिजित फुकोन
सरकारी नामनिर्देशित संचालक
डॉ अभिजित फुकोन
डॉ. अभिजित फुकन हे इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस (आयइएस २००४ बॅच) चे अधिकारी असून सध्या ते वित्तीय सेवा विभाग (डीएफएस), वित्त मंत्रालय, भारत सरकार, येथे आर्थिक सल्लागार आणि मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सीएसआयओ) म्हणून कार्यरत आहेत. ते इंडिया एक्झिम बँकेच्या बोर्डावर सरकार नामनिर्देशित संचालकदेखील आहेत.
शैक्षणिकदृष्ट्या, त्यांनी वित्त विषयात पीएचडी केली असून, अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी आणि एचआरडी आणि मार्केटिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमाचे शिक्षण घेतले आहे. अर्थशास्त्र, व्यवस्थापन आणि वित्तविषयक विविध विषयांवर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित जर्नल्समध्ये अनेक शोधनिबंध प्रकाशित केले आहेत.
व्यावसायिकदृष्ट्या, त्यांना शैक्षणिक, संशोधन आणि शासन सार्वजनिक धोरणामध्ये वीस वर्षांहून अधिक गाढा अनुभव आहे. शाश्वत वित्त, CSR/SDGs/ESG, कॉर्पोरेट गव्हर्नन्स, नियामक आणि अनुपालन, ऊर्जा आणि उर्जा क्षेत्र, पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक खासगी भागीदारी (PPP), आंतरराष्ट्रीय व्यापार इ. विषयांमध्ये त्यांचे सखोल ज्ञान आणि कौशल्य आहे.
वित्तीय सेवा विभागाच्या आधी त्यांनी वाणिज्य विभाग, आर्थिक व्यवहार विभाग, ऊर्जा मंत्रालय, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयात येथे सचिव, नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग ऑथॉरिटी (NFRA) या पदासह अनेक पदांवर काम केले आहे. सरकारच्या सेवेत असताना त्यांनी आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सुधारणा आणि धोरणात्मक बदल घडवून आणले आहेत.
एक गाढे अभ्यासक म्हणून त्यांनी फ्रँकफर्ट स्कूल ऑफ फायनान्स अँड मॅनेजमेंट, एनआयबीएम पुणे, आयआयएम बेंगळुरू (एफएसआयबी द्वारे आयोजित) तसेच ईडीआय, अहमदाबाद येथे विविध प्रशिक्षण कार्यक्रम आणि कार्यशाळांमध्ये सहभाग घेतला आहे. श्री रोहित ऋषी हे 1 नोव्हेंबर 2023 रोजी कार्यकारी संचालक म्हणून बँक ऑफ महाराष्ट्र च्या सेवेत रुजू झाले .
श्री संजीव प्रकाश
आरबीआय नामनिर्देशित संचालक
श्री संजीव प्रकाश
श्री संजीव प्रकाश हे 1998 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँके च्या सेवेमध्ये रुजू झाले. ते अभियांत्रिकी पदवीधर असुन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकर्स चे सर्टिफाईड असोसिएट (CAIIB) देखील आहेत. त्याच बरोबर त्यांनी फायनान्शियल रिस्क मॅनेजर पात्रता देखील मिळवली आहे.
रिझर्व्ह बँकेमधील गेल्या 25 वर्षांच्या सेवेत, श्री प्रकाश यांनी बँकेची विविध क्षेत्रीय कार्यालये तसेच बँकेच्या मुंबईतील मुख्य कार्यालयात उल्लेखनीय काम केले आहे.
बँकेच्या सेवेत असताना त्यांनी हाताळलेल्या प्रमुख जबाबदाऱ्यांमध्ये बँका, बिगर बँका आणि वित्तीय समूहांचे पर्यवेक्षण, मानव संसाधन व्यवस्थापन तसेच माहिती तंत्रज्ञान आणि प्रकल्प अंमलबजावणी इत्यादींच्या समावेश आहे. श्री प्रकाश यांनी बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर यांचे नायब राज्यपालांचे कार्यकारी सहाय्यक ही जबाबदारी देखील पार पाडली आहे.
त्यांची काही काळ बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्स (BIS), बासेल, स्वित्झर्लंड येथे फायनान्शियल स्टॅबिलिटी इन्स्टिट्यूटमध्ये प्रतिनियुक्ती करण्यात आली होती जिथे त्यांनी जागतिक पातळीवर प्रणालीगत महत्त्वाच्या असलेल्या बँकांच्या ओळख आणि निवडीवर काम केले.
श्री प्रकाश हे सध्या बँकेच्या मुंबईतील केंद्रीय कार्यालयात चलन व्यवस्थापन विभागात मुख्य महाव्यवस्थापक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. चलन व्यवस्थापन कार्यक्षमतेसाठी धोरण तयार करण्याच्या उपक्रमांचा एक भाग म्हणून, चलन विनिमय आणि नाण्यांचे वितरण सुलभ करण्यासाठी, खराब झालेल्या नोटांची विल्हेवाट लावणे, करन्सी चेस्टचे सुरळीत कामकाज आणि बनावट नोटांची दक्षता यासाठी ते प्रामुख्याने जबाबदार आहेत.
ते रिझर्व्ह बँकेचे प्रतिनिधी म्हणून म्हणून एसपीएमसीआयएलच्या बोर्डावर संचालक म्हणून देखील कार्यरत आहेत.
श्री. प्रवीण कुमार
भागधारक संचालक
श्री. प्रवीण कुमार
श्री प्रवीण कुमार यांना विमा आणि बँकिंग, विपणन, जोखीम व्यवस्थापन, प्रशासन आणि मानव संसाधन इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये 36 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. श्री प्रवीण कुमार यांनी भारतीय आयुर्विमा महामंडळ, LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड आणि LIC कार्ड्स सर्व्हिसेस लिमिटेडच्या शाखा/कार्यालयांमध्ये विविध पदांवर काम केले आहे.
यापूर्वी, ते एलआयसी कार्ड्स सर्व्हिसेस लिमिटेडचे मुख्य कार्यकारी आणि संचालक पदावर होते.
श्री प्रवीण कुमार यांची बँकेच्या संचालक मंडळावर भागधारक संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. 30.06.2024.
श्री. शशांक श्रीवास्तव
अर्धवेळ अशासकीय संचालक
श्री. शशांक श्रीवास्तव
श्री. शशांक श्रीवास्तव बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये बँकेचे अर्धवेळ अ-कार्यालयीन संचालक म्हणून २१-१२- रोजी तीन वर्षांच्या कालावधीसाठी रूजू झाले.
श्री. शशांक श्रीवास्तव यांच्याकडे अकाउंट्स, ऑडिट, टॅक्सेशन, कॉर्पोरेट कन्सल्टन्सी आणि संबंधित क्षेत्रात काम करण्याचा ३० वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे. ते पेशाने प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकौंटंट असून मेसर्स शशांक प्रेमचंद ॲण्ड कंपनी, चार्टर्ड अकाउंटंट कटनी, मध्यप्रदेश यांचे सन १९८९ पासून सिनिअर पार्टनर आहेत.
श्री शशांक श्रीवास्तव हे एम. कॉम, फेलो चार्टर्ड अकौंटंट (एफसीए) आहेत.
ते काही सामाजिक संस्थांचे सदस्य आणि खजिनदार आहेत.
श्री. सरदार बलजित सिंग
अर्धवेळ अशासकीय संचालक
श्री. सरदार बलजित सिंग
श्री. सरदार बलजित सिंग हे बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये २१-१२-२०२१ रोजी तीन वर्षांच्या कालावधीसाठी अर्धवेळ अ-कार्यालयीन संचालक म्हणून रुजू झाले.
श्री सरदार बलजित सिंग यांना अकौंटस, जीएसटी ऑडिट, ब्रांच ऑडिट, स्टॅच्युटरी ऑडिट, रेव्हन्यू ऑडिट ऑफ पब्लिक सेवटर बॅक्स ॲण्ड रीजनल रुरल बॅक्स, आर्थिक समावेशन , इन्कम टॅक्स, कार्पोरेट कन्सल्टन्सी इत्यादीचा अनुभव आहे. ते पेशाने प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकौंटंट आहेत आणि ते मेसर्स पी. कृष्णा अगरवाल ॲण्ड असोसिएटस् चार्टर्ड अकाउंटंट, बलिया, उत्तर प्रदेश यांचे पार्टनर आणि ब्रांच हेड आहेत.
श्री. सरदार बलजित सिंग हे बी.कॉम., एल.एल.बी., चार्टर्ड अकाउंटंट (सी.ए) डिप्लोमा इन इन्फर्मेशन सिस्टीम ऑडिट, डिप्लोमा इन. इन्शुअरन्स ॲण्ड रिस्क मॅनेजमेंट या पदव्या धारण केल्या आहेत.
ते बलिया चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीज, बलिया च्या संचालक मंडळाचे सदस्प असून काही सामाजिक संस्थांचे सदस्य आहेत.