सामाजिक जबाबदारी

बँक ऑफ महाराष्ट्र व कर्मचारी यांनी मिळून रु. 21लाख नाम/एनएएएम च्या स्थापनेसाठी अनुदान दिले.
श्री.नरेन्द्र काब्रा, सर्वसाधारण प्रबंधक, आयटी यांच्यासह सुधाकर धोडापकर, व सुरेश नानगरे यांनी-- बँक ऑफ महाराष्ट्रच्या निवृत्तांकडून रु. 21 लाखाचे दोन चेक नाम फाउन्डेशनला लोकमंगल, पुणे येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या प्रधान कार्यालय येथे प्रदान केले. या प्रसंगी श्री. राजकिरण भोईर, एम. सी. कुलकर्णी आणि मनोज बिसवाल हे बँकेचे सर्वसाधारण व्यवस्थापक उपस्थित होते. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते फाउन्डेशन सुरु केले गेले, हे कार्य महाराष्ट्रातील मराठवाडा व विदर्भामधील दुष्काळ प्रवण विभागातील शेतक-यांच्या भल्याकरिता केले गेले.

 

Bank of Maharashtra has donated Rs. 10,00,000/- (Ten Lakhs) to “NATIONAL SPORT’S DEVELOPMENT FUND” by the hands of Executive Director Sh. R. K. Gupta. Cheque was handed over to Sh. Rajiv Yadav, Secretary Sports. Zonal Head, Delhi Zone Sh. C. K. Verma was also present in the function.बँक ऑफ महाराष्ट्रने रु 10,00,000/- (दहा लाख) श्री. आर. के. गुप्ता, कार्यकारी संचालक यांच्या हस्ते ‘ नॅशनल स्पोर्टस् डेव्हलपमेंट’ फंड यांना अनुदान केले. धनादेश श्री. राजीव यादव, सेक्रेटरी स्पोर्टस्, यांना सुपूर्द केला. समारंभाला विभागीय प्रमुख, दिल्ली विभाग, श्री. सी. के. वर्मा हेसुद्धा उपस्थित होते.

 

Chairman & Managing Director of Bank of Maharashtra Shri S. Muhnot and Executive Diretcor Shri R. K. Gupta has handed over the cheques of Rs 1.25 crore to Hon’ble Finance Minister Shri Arun Jaitely as CSR contribution under Swatch Bharat Kosh and Prime Minister Relief Fund on 3rd June 2015तारीख 3 जून 2015 रोजी बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. एस मुनोत आणि कार्यकारी संचालक श्री. आर. के, गुप्ता यांनी माननीय आर्थिक मंत्री श्री. अरुण जेटली यांना स्वच्छ भारत कोष आणि पंतप्रधान रिलीफ फंड याअंतर्गत सीएसआर योगदान स्वरूपी रु.1.25 कोटीचा चेक प्रदान केला.

 

माळीणगावाला अन्न, पाणी व औषधांचा संच यांची मदत सीएसआर च्या अंतर्गत महाराष्ट्र बँकेने दिली.
फोटोमध्ये :
श्री. आर के गुप्ता, कार्यकारी संचालक (उजवीकडून 4 थे) आणि श्री. एस भरतकुमार, जनरल मॅनेजर, रिसोर्स प्लॅनिंग (डावीकडून 3 रे) महाराष्ट्र बँकेने माळीणगावाला पाठवलेल्या मदतनिधीच्या वाहनाला झेंडा फडकावून दाखविताना.

 

बैंक ऑफ महाराष्ट्र च्या वतीने सासवड येथे संपन्न होणा-या 87 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनास रु॰ 3,00,000/- चा धनादेश , बँकेचे कार्यकारी संचालक श्री॰ आर॰ आत्माराम यांचे हस्ते, स्वागताध्यक्ष श्री॰ विजय कोलते पाटील यांना सुपुर्द करण्यात आला॰

 

महाराष्ट्र बँकेने श्री अपंग विकास मंडळ, सासवड यांना ` 2.00 लाख देणगीदाखल दिले. हे मंडळ विशेष बालकांसाठी दिवे, जिल्हा पुणे येथे जीवनवर्धिनी मतिमंद निवासी विद्यालय चालविण्याचे कार्य करते. देणगीदाखल दिलेल्या रकमेचा विनियोग या शाळेच्या इमारत बांधकामासाठी केला जाईल.
फोटोमध्ये दिसत आहेत (डावीकडून उजवीकडे)-- श्री. बाळासाहेब झेंडे, श्री अपंग विकास मंडळ, सासवड याचे संस्थापक, श्री. शशीकांत मुकीम, शाखा व्यवस्थापक, श्री, भरतकुमार, महाव्यवस्थापक, नियोजन, महाराष्ट्र बँक, श्री. संजय रुद्र, विभागीय व्यवस्थापक, पुणे पूर्व विभाग, महाराष्ट्र बँक.

 

’बँक ऑफ महाराष्ट्र’ने मुख्यमंत्री मदत निधीला रु.251.00 लाखांची देगणी दिली. (2013 चा दुष्काळ) दुष्काळ निधीसाठी
फोटोत दिसत आहेत (डावीकडून उजवीकडे) श्री एस भरतकुमार, सरव्यवस्थापक, नियोजन, श्री नरेंद्र सिंह, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, बँक ऑफ महाराष्ट्र, श्री पृथ्वीराज चव्हाण, मा. मुख्यमंत्री, श्री पी एम खान, सरव्यवस्थापक, मुंबई शहर क्षेत्र .

 

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री नरेंद्र सिंह आणि कार्यकारी संचालक श्री सीव्हीआर राजेंद्रन, महाबँक शिष्यवृत्ती प्राप्त करणा-या कु. पायल विलास छावत, जि. वरवंड आणि कु. ईशा अनिरुध्द पाटणकर या अनुक्रमे 100% आणि 98.4% गुण मिळवणा-या विद्यार्थिनी आणि त्यांचे पालक यांचे सत्कार करताना

 

शाखा व्यवस्थापक, लोणी (वरुड) शाखा, अमरावती क्षेत्र यांनी सीएसआर उपकमाअन्वये येवदा येथील जिल्हा परिषदेच्या मुलींच्या प्राथमिक विद्यालयाला सीलींग फॅन देणगी म्हणून प्रदान केला. बँकेने आजवर 551 मुलींच्या प्राथमिक शाळांना आरोग्य आणि मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा व्हावी म्हणून रु.1,50,000/- देगणीदाखल दिले आहेत.सीएसआर उपक्रमांअन्वये जि.बाराबंकी, उत्तर प्रदेश येथे सोलर स्ट्रीट लाईटची देणगी.

बँकेच्या हडपसर आणि भिगवण येथील ग्रामीण विकास केंद्रांनी शेतक-यांच्या हिताच्या दृष्टीने विविध विकास कार्यक्रम हाती घेतले आहेत, उदा. प्रयोगशाळा ते भूमी प्रकल्प, क्षारयुक्त मातीचा पुन्हा उपयोग/पुनरुजजीवन आणि अधिकाधिक फलितासाठी मूलभूत सामग्रीच्या शास्त्रीय वापरासंबंधी सल्ला.

महाबँक कृषि संशोधन आणि ग्रामीण विकास प्रतिष्ठान (एमएआरडीइएफ ) विविध उपक्रम शेतक-यांनी हाती घ्यावेत म्हणून त्यांना उत्तेजन देत खेडय़ांच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी कार्यरत आहे.. या उपक्रमांमध्ये दुग्धव्यवसाय, एमू पालन, मेंढय़ांची पैदास, द्राक्ष लागवड, बागायत आणि खतांसारख्या विविध सामग्रीच्या शास्त्रीय वापराचा समावेश आहे. हे प्रतिष्ठान शेतक-यांना, विशेषत: लघु आणि अल्पभूधारक शेतक-यांना तत्परतेने बँक क्रेडिट मिळवून देण्यासाठी सहाय्य करते.

स्वयंरोजगारासाठी ग्रामीण युवकांना आणि महिलांना विशेष कौशल्य आत्मसात करणं शक्य व्हावं म्हणून प्रशिक्षण देण्यासाठी बँकेने पाच महाबँक स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्था पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक आणि अमरावती येथे स्थापन केल्या आहेत. या संस्थांतर्फे स्वयंरोजगाराची कौशल्ये ग्रामीण युवक आणि स्त्रियांना आत्मसात करणे शक्य व्हावे म्हणून प्रशिक्षण देण्यात येते. या संस्थांतर्फे आजपर्यंत 4605 उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.


महाराष्ट्र राज्य रोजगार प्रशिक्षण संस्था (एमएसइटीआय) - वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम

बँक ऑफ महाराष्टखने 1989 मध्ये उभारलेली स्वयंसेवी संस्था - ग्रामीण महिला व बालक विकास मंडळ - स्वयंसेवी गटांची उभारणी, संवर्धन, प्रशिक्षण आणि बँक पतसुविधेशी त्यांचा दुवा जोडणे, या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी आहेत. ग्रामीण महिला व बालक विकास मंडळ, स्व-मदत गटांच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी , सावित्री या नावानं पुणे शहरात स्थापन केलेल्या दोन केंद्रांव्दारे स्वमदत गटांना मदतही करते. बँकेची ही स्वयंसेवी संस्था, दर्जेदार कच्चा माल-सामग्री मिळवून देणे- खरेदी आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन, नंतर त्याचे विपणन व विक्री यासाठी स्व-मदत गटांना सक्रिय सहाय्य आणि मार्गदर्शन करते. प्रगल्भ स्व-मदत गटांचे आधुनिकीकरण करुन त्यांचे रुपांतर लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये करण्यासाठीही सहाय्य देण्यात येते. महाराष्टख शासनाने ग्रामीण महिला व बालक विकास मंडळाला मातृ-स्वयंसेवी संस्था म्हणून मान्यता दिली आहे.

महाबँक विदर्भ शेतकरी जागृती अभियान हा एक बँक ऑफ महाराष्टख आणि हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यांचा संयुक्त उपक्रम आहे. या उपक्रमान्वये विदर्भातील सहा जिह्यांमधील 5750 हून अधिक शेतक-यांशी सल्ला आणि प्रशिक्षणाव्दारे सुसंवाद साधण्यात आला आहे.

 
Insurance Products
गृहकर्जाकरिता "डायरेक्ट सेलिंग एजन्ट/डीएसए"
उद्यमी मित्र
अटेन्शन एनआरआय कस्टमर्स
Car Dealers Tie-up Form
MAHA e-PAY
Reservation Roster
इंटिग्रिटी प्लेज सीव्हीसी तर्फे
शाखा शोधा (लोकेट करा)/ एटीएम
OTS Settlement Request
बँकेचे विलफुल डिफॉल्टर्स
विशेष शाखांची यादी

वापरकर्त्याची नियमावली - यूपीआय
Revised Marginal Cost of Funds Based Lending Rate (MCLR) with effect from 07.10.2018

Press Release For the Quarter and Nine months ended 31st December 2017

Rupay Debit Card Offers

तारीख 01-02-2016 च्या अधिसूचनेच्या सेवा शुल्कातील सुधारणा 01-08-2017 पासून लागू

तारीख 01/07/2017 पासून लागू असलेले सीएमएस शुल्क य़य़

FAQs International Debit Card

A Little extra care makes your online transactions more secure

Account Portability : Transfer of account from one branch to another branch in the Bank

Bank's Codes of Commitments to Customers

List of branches authorized for opening of PPF Account

RBI Monetary Museum - Reserve Bank of India

General Information about the Museum
आयात / निर्यात चलन
राज्यनिहाय सुट्ट्या
महत्त्वाचेः :बँक ऑफ महाराष्ट्र कोणत्याही कारणास्तव फोन/इमेल/एसएमएस द्वारे बँक खात्याचे तपशील कधीही विचारीत नाही.

बँक सर्व ग्राहकांना विनंती करत आहे की, अशा फोन/इमेल/एसएमएस यांना प्रतिसाद देऊ नये आणि त्यांचे बँक खात्याचे तपशील कोणत्याही कारणास्तव कोणालाही देऊ नये. तुमचा सीव्हीव्ही/डेबिट-पिन क्रमांक/क्रेडिट कार्ड कोणालाही देऊ नये.