शैक्षणिक कर्ज योजना

अनुमानित/ मान्यताप्राप्त(क्रेडिटेड) विद्यापीठे/संस्था आणि व्यावसायिक अभ्यासक्रम --व्याजी अर्थसाहाय्य योजना/इंटरेस्ट सबसिडी स्कीम

शैक्षणिक कर्जासंबद्धी माहिती

उद्देश भारतामध्ये आणि विदेशात अभ्यासासाठी
अर्हता/योग्यता भारतामधील अभ्यासः  पदवी अभ्यासक्रम/यूजीसी तर्फे मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या अंतर्गत कॉलेजेस. यूजीसी/शासन/एआयसीटीई/एआयबीएमएस/आयसीएमआर इत्यादींतर्फे मान्यताप्राप्त पदविका/पदवी इत्यादींप्रत इतर अभ्यासक्रम.

विदेशात अभ्यासः : नोकरीसन्मुख व्यावसायिक/तांत्रिक/पदव्युत्तर अभ्यासक्रम/ पदव्युत्तर शिक्षणः एमसीए, एमबीए, एमएस इत्यादी
वय विद्यार्थी भारतीय नागरिक असावा, प्रवेश परीक्षा/गुणवत्ता पायाभूत निवडीने प्रवेश मिळवलेला असावा.
कमाल रक्कम भारतामध्ये: ` 10.00 लाख
विदेशामध्ये: ` 20.00 लाख
सुरक्षितता ` 4.00 लाख पर्यंत -- स्पष्ट/क्लीन-
हमीदार/गॅरंटर ` 4.00 लाख ते ` 7.00 लाख  
समाधानकारक तिसरी व्यक्ती हमीदार/थर्ड पार्टी गॅरंटी
` 7.00 लाख च्या वर
खाली नमूद केल्याप्रमाणे आवश्यक मार्जिन दिल्यानंतर आनुषंगिक सुरक्षिततेचे मूल्य आर्थिक परिमाण अधिक 2 स्वीकार्य हमीदार एवढे असावे. कर्जातून खरेदी केलेला कम्प्युटर तारणगहाण राखला जाईल.
मार्जिन/मर्यादा 4.00 लाख पर्यंत--काहीही नाही
` 4.00 लाख च्या वर
5% -- भारतातील अभ्यासासाठी 
15% -- विदेशातील अभ्यासासाठी
वजावट मर्यादा लागू नाही
व्याजदर Loans up to Rs. 4.00 lac = Base Rate + 2.50%
Loans above Rs. 4.00 lac & upto 7.50 lac = Base Rate + 2.00%
Loans above Rs.7.50 lac = Base Rate + 1.25%
  • Simple interest during moratorium period, there after compounded monthly
  • 1% interest concession may be provided to the loanees if the interest is serviced regularly as and when applied during the study period when repayment holiday is specified for interest/ repayment under the scheme. Interest concession is available only for moratorium period.
परतावा इएमआय -- 60 महिने (कर्ज + उपार्जित व्याज एकत्र)
अधिस्थगित/पुढे ढकललेल्या अभ्यासक्रम कालावधि + 1 महिना किंवा 6 महिने नोकरीवर रुजू झाल्यानंतर -- जे अगोदर असेल ते.
प्रक्रिया शुल्क काही नाही
विमा लागू नाही
अन्य
  • पालक सह-कर्जदार असलेल्या विद्यार्थ्याला कर्ज दिले जाईल
  • प्रत्यक्ष संस्था किंवा कॉलेजकडे आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने कर्ज सुपुर्द केले जाईल.
अन्य सुविधा आमच्या वेबसाइटवरून ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थी शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करू शकतो. ही सुविधा निवडक 75 शाखांमध्ये सध्या उपलब्ध आहे. (लवकरच ही संख्या ब-यापैकी वाढेल.)
 

आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जावर व्याजात सवलत


आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कर्जावर कर्जमुदतीच्या काळात व्याजात सवलत देण्याची प्रधान योजना

शैक्षणिक कर्ज योजनेअन्वये आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांनी घेतलेल्या कर्जाच्या मुदती दरम्यान पूर्ण व्याज सूट देण्याच्या योजनेला भारत सरकारने मान्यता दिली आहे. ही कर्जे भारतातील कुठल्याही मान्यताप्राप्त संस्थेतील तांत्रिक आणि व्यावसायिक स्वरुपाच्या प्रमाणित अभ्यासक्रमांपैकी कुठल्याही अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी ही योजना आहे.

या योजनेची मार्गदर्शक तत्वे आपल्या माहितीसाठी देत आहोत,ती खालीलप्रमाणे :

1. योजनेसाठी पात्रता

ही योजना भारतातील मान्यताप्राप्त तांत्रिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांपुरतीच मर्यादित आहे. व्याजातील सूट आमच्या बँकेच्या सध्याच्या आदर्श शैक्षणिक कर्ज योजनेशी संबंधित असेल. लोकसभेच्या कायद्यान्वये प्रस्थापित झालेल्या भारतातील शैक्षणिक संस्था, संबंधित कायदेशीर मंडळांनी मान्यता दिलेल्या अन्य संस्था, केंद्र/राज्य सरकारने स्थापन केलेल्या इंडियन इन्स्टीटय़ूटस ऑफ मॅनेजमेंट आणि अन्य संस्थांमधील तांत्रिक/व्यावसायिक अभ्यासक्रमात (बारावीनंतर ) प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपुरतीच ही योजना मर्यादित आहे.

2. व्याजातील सूट मिळण्यासाठी पात्रता

या योजनेअन्वये पात्र विद्यार्थ्यांना एकदाच व्याजातील सूट मिळू शकेल. भारतातील पहिल्या पदवीपर्यंतचा अभ्यासक्रम किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम/पदविका अशा अभ्यासक्रमांसाठी ही योजना आहे. तरीसुध्दा व्याज सवलत ही एकात्म अभ्यासक्रमांसाठीच असेल (पदवी + पदव्युत्तर )

या योजनेअन्वये मिळणारी व्याज सूट अभ्यासक्रम मध्येच सोडणा-यांना किंवा शिस्तीच्या अथवा शैक्षणिक कारणांवरुन संस्थामधून हकालपट्टी होणा-यांना मिळणार नाही. तरीसुध्दा अभ्यासक्रमातील खंड वैद्यकीय कारणांमुळे उदभवल्यास ही सूट मिळू शकेल, मात्र त्यासाठी त्या विशिष्ट शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखांना समाधानकारक वाटतील अशी आवश्यक ती कागदपत्रे द्यावी लागतात.

3. सूट लागू होण्याचा काळ

या योजनेअन्वये कर्जमुदतीच्या काळासाठी म्हणजेच अभ्यासक्रमाच्या कालावधीसाठी + नोकरी मिळाल्यानंतर एक वर्ष किंवा सहा महिन्यांनंतर, जो कालावधी लौकरचा असेल त्या कालावधीसाठी, बँकेच्या आदर्श शैक्षणिक कर्ज योजनेअन्वये निर्धारित केल्याप्रमाणे तांत्रिक/व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक कर्ज घेण्याबद्दल आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना बँकेला द्यावे लागणारे व्याज भारत सरकारकडून बँकेकडे जमा केले जाईल.

4. लागू होण्याचा शैक्षणिक कालावधी

ही योजना 1 एप्रिल, 2009 पासून सुरु झालेल्या 2009-10 या शैक्षणिक वर्षापासून लागू झाली. 2009-10 (मंजुरीच्या तारखेशी काही संबंध नाही ) या शैक्षणिक वर्षापासून सुरु होणारी कर्जाची रक्कमच केवळ व्याजातील सूट देण्याच्या या योजनेखाली येते.

टीप : 2009-10 या शैक्षणिक वर्षाआधी सुरु झालेल्या अभ्यासक्रमांसाठी देण्यात आलेल्या कर्जाऊ रकमांबाबत व्याजातील सवलतीच्या योजनेचा विचार केला जाणार नाही.

5. उत्पन्न मर्यादा

पालकांचे/कुटुंबाचे एकूण कमाल वार्षिक उत्पन्न रु.4.5 लाख प्रति वर्ष (सर्व स्त्रोतांमधून ) असलेल्या आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना या योजनेचे लाभ मिळू शकतील. सर्व स्त्रोतांमधून कुटुंबाची/पालकांची एकूण कमाल उत्पन्न मर्यादा वर निर्देश केल्याप्रमाणे असलेल्या आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी असलेली ही योजना सामाजिक पार्श्वभूमीपेक्षा आर्थिक निर्देशांकावर आधारित आहे.

6. आयकर प्रमाणपत्रासाठी असलेले सक्षम अधिकारी

केंद्र किंवा राज्य सरकारच्या योजनांप्रमाणेच या योजनेअन्वये आर्थिक परिस्थितीच्या प्रमाणपत्रासाठी राज्य शासनाने अधिकार दिलेल्या सरकारी अधिका-यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला विद्यार्थ्यांना सादर करावा लागतो.

महाराष्ट्रात आयकर प्रमाणपत्र देण्यासाठी तहसीलदारांना सक्षम अधिकारी म्हणून मान्यता आहे.

इतर राज्यांसाठी विद्यार्थी कर्जदारांनी अशा प्रकारची उत्पन्न प्रमाणपत्रे देण्याचा अधिकार मिळालेल्या सक्षम अधिका-यांच्या तपशिलांसंबंधी माहिती मिळवण्यासाठी आमच्या शाखा अधिका-यांशी संपर्क साधावा.

7. इतर

राज्य सरकारच्या अन्य योजनेअन्वये अशी सवलत घेतली जात नसल्यास या योजनेअन्वये व्याज सवलतीचा लाभ घ्यावा.

या योजनेअन्वये कर्जमुदती दरम्यान व्याज सवलतीचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करण्याकरिता (शैक्षणिक कर्जे जेथून घेतली असतील तेथे ) संबंधित शाखांमध्ये सर्व पात्र विद्यार्थी कर्जदारांनी भेटावे अशी विनंती आहे. व्याज सवलतीकरिता अर्ज सादर करण्यासाठी शाखा अधिका-यांना भेटण्याआधी वरील सर्व माहिती काळजीपूर्वक अभ्यासावी.

या योजनेअन्वये व्याज सवलतीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी कर्जदारांनी पुढील कार्यपध्दतीचा अवलंब करावा :

  1. मुद्दा क्र. 5 मध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे आयकर प्रमाणपत्र मिळवावे.
  2. सर्व योग्य ती प्रमाणपत्रे घेतली असल्याची खात्री करुन घ्यावी आणि संबंधित शाखांमधील अधिका-यांना भेटावे.
  3. सवलतीसाठी असलेला अर्ज सादर करावा. (शाखा अधिंकारी अर्ज/करारनामा देतील.)
Insurance Products
गृहकर्जाकरिता "डायरेक्ट सेलिंग एजन्ट/डीएसए"
उद्यमी मित्र
अटेन्शन एनआरआय कस्टमर्स
Car Dealers Tie-up Form
MAHA e-PAY
Reservation Roster
इंटिग्रिटी प्लेज सीव्हीसी तर्फे
शाखा शोधा (लोकेट करा)/ एटीएम
OTS Settlement Request
बँकेचे विलफुल डिफॉल्टर्स
विशेष शाखांची यादी

वापरकर्त्याची नियमावली - यूपीआय
Revised Marginal Cost of Funds Based Lending Rate (MCLR) with effect from 07.10.2018

Press Release For the Quarter and Nine months ended 31st December 2017

Rupay Debit Card Offers

तारीख 01-02-2016 च्या अधिसूचनेच्या सेवा शुल्कातील सुधारणा 01-08-2017 पासून लागू

तारीख 01/07/2017 पासून लागू असलेले सीएमएस शुल्क य़य़

FAQs International Debit Card

A Little extra care makes your online transactions more secure

Account Portability : Transfer of account from one branch to another branch in the Bank

Bank's Codes of Commitments to Customers

List of branches authorized for opening of PPF Account

RBI Monetary Museum - Reserve Bank of India

General Information about the Museum
आयात / निर्यात चलन
राज्यनिहाय सुट्ट्या
महत्त्वाचेः :बँक ऑफ महाराष्ट्र कोणत्याही कारणास्तव फोन/इमेल/एसएमएस द्वारे बँक खात्याचे तपशील कधीही विचारीत नाही.

बँक सर्व ग्राहकांना विनंती करत आहे की, अशा फोन/इमेल/एसएमएस यांना प्रतिसाद देऊ नये आणि त्यांचे बँक खात्याचे तपशील कोणत्याही कारणास्तव कोणालाही देऊ नये. तुमचा सीव्हीव्ही/डेबिट-पिन क्रमांक/क्रेडिट कार्ड कोणालाही देऊ नये.