कॅपिटल मार्केट ऍप्लिकेशन (एएसबीए )


एएसबीए (ऍप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट)

एएसबीए ऍप्लीकेशन स्वीकारण्यासाठी निश्चिबत शाखांची यादी

प्रायमरी मार्केटससाठी अर्ज करणे आणि स्टॉक दिला जाईपर्यंत रक्कम न मोजता व्याज मिळवत राहणे यासाठी गुंतवणूकदार-पूरक मार्ग

एएसबीए म्हणजे काय ?

 • एएसबीए म्हणजे ’ऍप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट’, एएसबीए मुळे आयपीओज/एफपीओज साठी आणि आणि राइटस इश्यूसाठी रक्कम न भरता गुंतवणूक करता येते. या संकल्पनेप्रमाणे रक्कम न भरता गुंतवणूकदाराच्या स्वतःच्या खात्यात रक्कम ठेवली जाते आणि शेअर्स अलॉट करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जेवढे शेअर्स अलॉट झाले असतील तेवढीच रक्कम पाठवली जाते.
 • एएसबीए म्हणजे इनिशिअल पब्लिक ऑफर्स (आयपीओ), राईट इश्यूज आणि फॉलो ऑन पब्लिक ऑफर्स (एफपीओ) साठी अर्ज करण्याची एक पूरक प्रक्रिया असून ती बुक बिल्डींग रुटव्दारे करण्यात येते तसेच रक्कम भरण्याचा एक प्रकार म्हणून चेकचा वापर करणे आणि अर्ज सादर करणे या चालू प्रक्रियेचाही समावेश या पूरक प्रक्रियेत होतो.
 • बँकेने बीएसई तील बुक बिल्डींगसह इश्यूजसाठी ही मूल्यवर्धित - व्हॅल्यू ऍडेड - सेवा उपलब्ध केली आहे.

गुंतवणूकदाराची पात्रता :

 1. या अर्जामध्ये तीन बिडपर्यंत पर्याय आहेत आणि त्यात सुधारणाही करता येते. तीन बिडपैकी जी सगळ्यात जास्त रक्कम असेल त्यानुसार लीन असेल.
 2. एकूण अर्जाची रक्कम वैयक्तिक, कर्मचारी, शेअरहोल्डर्स च्या गुंतवणूक प्रकारासाठी रु.२,००,००० इतकी किंवा त्यापेक्षा कमी असेल तर कट-ऑफ प्राइस बिडला परवानगी असते.
 3. आयपीओ मध्ये जास्तीत जास्त पाच अर्जांसाठी एक खाते ब्लॉक करता येते.
 4. रिटेल वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी बिडसमध्ये सुधारणा आणि ती रद्द करणे यासाठी इश्यू बंद होण्याच्या तारखेपर्यंत आणि वेळेपर्यंत परवानगी असते. तरीसुध्दा रिटेलशिवाय अन्य गुंतवणूकदारांसाठी शेवटच्या दिवशी दुपारी ४.०० नंतर बदल वा सुधारणा करायला परवानगी नसते.
अशा गुंतवणूकदारांना ’एएसबीए गुंतवणूकदार’ म्हणून ओळखतात, ’एएसबीए’ अर्ज सादर करतेवेळी गुंतवणूकदारांनी योग्य ती बाबींची अचूक पूर्तता करताना जास्तीत जास्त काळजी घेणे आवश्यक आहेः -
 • पॅन
 • डीपी आयडी
 • क्लायंट आयडी
 • बिड क्वांटीटी
 • ११ आकडी बँक खाते नंबर ( सेव्हींग/करंट )

गुंतवणूकदारांसाठी ’एएसबीए’चे फायदे :

 • गुंतवणूकदारांना अर्जाच्या रकमेइतके त्याचे/तिचे बँक खाते ब्लॉक करण्यामुळे अर्जाचे पैसे चेकने भरण्याची आवश्यकता नसते आणि अशा प्रकारे अर्जाच्या पैशावरील व्याज मिळवत राहता येते.
 • गुंतवणूकदाराला रक्कम परत मिळवण्याबाबत चिंता करावी लागत नाही, याचे कारण म्हणजे सिक्युरिटीज देण्याबाबतच्या आधारतत्वाला एकदा अंतिम स्वरुप आले की अलॉटमेंटसाठी त्याचा/तिचा अर्ज निवडण्यात आला की एएसबीए प्रक्रियेमध्ये अलॉट केलेल्या सिक्युरिटीजच्या प्रमाणातच रक्कम बँक खात्यातून घेतली जाते.
 • ऍप्लीकेशन फॉर्म अधिक सोपा आहे.
 • गुंतवणूकदाराचे संबंधही त्याला माहिती असलेल्या मध्यस्थाशी म्हणजे त्याच्या/तिच्या बँकेशीच येतात.

एएसबीए कार्यपध्दतीची कार्यवाही वेळोवेळी प्रचलित असलेल्या ’सेबी’ मार्गदर्शक तत्वांप्रमाणे होते.

भारतभरातील विशिष्ट अशा नियुक्त शाखांव्दारे एएसबीए सुविधा उपलब्ध असते.

’एएसबीए’साठी डिमॅट सेल, फोर्ट, मुंबई ही मुख्य शाखा आहे, बाकी तपशिलांसाठी येथे संपर्क साधावा

बँक ऑफ महाराष्ट्र
डिमॅट सेल, फोर्ट शाखा, दुसरा मजला, जनमंगल,
४५/४७, मुंबई समाचार मार्ग, मुंबई - ४०० ०२३.
फोन : (०२२) २२६२ ६७८/०५०२-२२६३०४०१,
फॅक्स : २२६२२१७७९
इ-मेल : demat_mum@mahabank.co.in

एएसबीए मधील गुंतवणूकदारांचे प्रकार:

अनु.क्र गुंतवणूकदारांचे (अशील) प्रकार
1. वैयक्तिक किंवा कॉर्पोरेट व्यतिरिक्त एफआयआयएस
2. म्युच्युअल फंडस
3. विमा कंपनी
4. बँका आणि एफआय
5. इतर क्यूआयबीज
6. बॉडीज कॉर्पोरेट
7. एनआयआय - इतर (क्यूआयबीज, बॉडीज कॉर्पोरेट आणि वैयक्तिक व्यतिरिक्त )
8. आरआयआय - ( रु.१ लाख पर्यंत अर्ज करणारे वैयक्तिक पातळीवरील अर्जदार) तसेच व्यक्ती/एचयूएफ, ट्रस्ट ( रु.१ लाखाच्या आतील अर्ज करणारे )
9. कर्मचारी
10. शेअरहोल्डर्स
 
Last update Date: 21.3.12
“Direct Selling Agent” for Housing Loan
उद्यमी मित्र
अटेन्शन एनआरआय कस्टमर्स
इंटिग्रिटी प्लेज सीव्हीसी तर्फे

वापरकर्त्याची नियमावली - यूपीआय
शाखा शोधा (लोकेट करा)/ एटीएम
बँकेचे विलफुल डिफॉल्टर्स
Revised Marginal Cost of Funds Based Lending Rate (MCLR)/ Base Rate with effect from 07.04.2018

Press Release For the Quarter and Nine months ended 31st December 2017

Rupay Debit Card Offers

तारीख 01-02-2016 च्या अधिसूचनेच्या सेवा शुल्कातील सुधारणा 01-08-2017 पासून लागू

तारीख 01/07/2017 पासून लागू असलेले सीएमएस शुल्क य़य़

FAQs International Debit Card

A Little extra care makes your online transactions more secure

Account Portability : Transfer of account from one branch to another branch in the Bank

Bank's Codes of Commitments to Customers

List of branches authorized for opening of PPF Account

RBI Monetary Museum - Reserve Bank of India

General Information about the Museum
विशेष शाखांची यादी
आयात / निर्यात चलन
राज्यनिहाय सुट्ट्या
महत्त्वाचेः :बँक ऑफ महाराष्ट्र कोणत्याही कारणास्तव फोन/इमेल/एसएमएस द्वारे बँक खात्याचे तपशील कधीही विचारीत नाही.

बँक सर्व ग्राहकांना विनंती करत आहे की, अशा फोन/इमेल/एसएमएस यांना प्रतिसाद देऊ नये आणि त्यांचे बँक खात्याचे तपशील कोणत्याही कारणास्तव कोणालाही देऊ नये. तुमचा सीव्हीव्ही/डेबिट-पिन क्रमांक/क्रेडिट कार्ड कोणालाही देऊ नये.