Azadi ka Amrit Mahatsav

Last Visited Page  

सह-कर्ज (डिजिटल कर्ज)

बँक ऑफ महाराष्ट्रने मे. लोन टॅप क्रेडिट प्रॉडक्टस् प्रायव्हेट लिमिटेड (एलसीपीएल) यांच्याशी को-लेंडिंग मॉडेल (सीएलएम ) अंतर्गत एमएसएमई आणि किराणा स्टोअर्स सारख्या छोट्या व्यवसायांना व्यावसायिक कर्जपुरवठा करण्यासाठी एक करार केला आहे.

मे. लोन टॅप क्रेडिट प्रॉडक्टस् प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना १० मे २०१६ रोजी डिजिटलं पद्धतीने कर्जपुरवठा करण्यासाठी ऑनलाईन इंटिग्रेटेड लेंडिंग प्लॅटफॉर्म प्रदान करण्यासाठी करण्यात आली आहे. कंपनीचे मुख्यालय पुण्यात असून त्यांचा नोंदणीकृत कार्यालयीन पत्ता पुढीप्रमाणे : ऑफीस नं. १०३, पहिला मजला, हरमस वेव्हज कल्याणीनगर पुणे ४११ ००६ सदर एलटीसीपीपीएल डिजिटल लेंडिंग प्लॅटफॉर्ममार्फत दोनही बाजूंसाठी कर्ज प्रक्रियेची साखळी (प्रारंभ, नोंदणी, कर्जपुरवठा, व्यवस्थापन आणि वसुली ) या प्रकिया स्वयंचलित पद्धतीने करते.

 

बँक ऑफ महाराष्ट्र लोन टॅपच्या मदतीने सीएलएम अंतर्गत पुढीलप्रमाणे कर्जपुरवठा करीत आहे.:

  1. टीएल- लोन टॅप एमएसएमई

अ.क्र.

तपशील

आवश्यक माहिती

i.

योजनेचे नाव

टीएल- लोन टॅप एमएसएमई

ii.

किमान आणि कमाल कर्जपुरवठा

किमान ०.५० लाख आणि कमाल ३.०० लाख

iii.

परतफेडीची किमान आणि कमाल मुदत

किमान १२ महिने आणि कमाल ३६ महिने

iv

लागू होणारा व्याजदर (स्लॅब असल्यास)

व्याजदर = आरआरएलआर

               + बीएसएस (०.५०%)

                + ४.५०%

v.

प्रक्रिया शुल्क आणि त्याचा दर

०.७५%

vi.

परतफेडीची पद्धत

समान मासिक हप्ता