
श्री ए एस राजीव
व्यवस्थापकीय संचालक मुख्य कार्यकारी अधिकारी

श्री ए एस राजीव
बॅंक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून श्री. ए. एस. राजीव यांनी २ डिसेंबर २०१८ रोजी पदभार स्विकारला. त्यापूर्वी ते २२ जानेवारी २०१६ पासून इंडियन बॅंकेचे प्रशासकीय संचालक होते.
राजीव यांना बॅंकिंग क्षेत्रातील तीन दशकांचा अनुभव असून, या कालावधीत त्यांनी सिंडीकेट बॅंक, विजया बॅंक आणि इंडियन बॅंक या बॅंकांमध्ये काम केले आहे. राजीव हे चार्टड अकाऊंटंट असून, बॅंकिंग क्षेत्रातील कार्पोरेट क्रेडिट, आंतरराष्ट्रीय बॅंकिंग, ट्रेझरी, रिस्क मॅनेजमेंट, क्रेडिट मॉनिटरिंग आणि सुपरव्हिजन, एनपीए मॅनेजमेंट, प्लॅनिंग आणि डेव्हलपमेंट, मनुष्यबळ, फायनान्स, अकाऊंटस आणि टॅक्सेशन, व्हिजिलन्स, क़ॉर्पोरेट गव्हर्नन्स, इन्स्पेक्शन आणि ऑडिट, सायबर सिक्युरिटी आणि सबसिडायरिज या बॅंकिंग विभागातील त्यांना प्रदिर्घ अनुभव असून, ते यातील तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात.
राजीव यांच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदाच्या कालावधीत बॅंक ऑफ महाराष्ट्राचा लौकिक कायम उंचावला. त्यांच्या नेतृत्वाखाली बॅंकेने २ लाख ५० हजार कोटी रुपयांचा विक्रमी व्यवसाय केला. एक्सीम बॅंक, न्यू इंडिया अॅश्युरन्स सारख्या कंपन्यांच्या संचालक मंडळावरही राजीव नियुक्त आहेत. बॅंकिंग कर्मचाऱ्याच्या निवड संस्थेच्या (आयबीपीएस - इन्स्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सनल सिलेक्शन) प्रशासकीय संचालक मंडळाचेही ते सदस्य आहेत. भारतीय बॅंक संघटनेच्या (इंडियन बॅंकिंग असोसिएशन) व्यवस्थापकीय समितीचेही ते सदस्य आहेत. राष्ट्रीय बॅंक व्यवस्थापन संस्थेच्याही (एनआयबीएम - नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बॅंकिंग मॅनेजमेंट) प्रशासकीय मंडळावर ते आहेत.
इंडियन बॅंकेचे प्रशासकीय संचालक असताना ते एनपीसी आणि अन्य दोन बॅंकेच्या सबसिडायरिजचे (मेसर्स इंडबॅंक मर्चंट बॅंकिंग सर्व्हिसेस मर्या. आणि मेसर्स इंड बॅंक हौसिंग मर्यादित) संचालक होते. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया आणि सरकारच्या विविध समितीचे सदस्य म्हणूनही त्यांना कामाचा अनुभव आहे.
विजया बॅंकेचे महाव्यवस्थापक आणि मुख्य आर्थिक अधिकारी असताना राजीव यांनी फायनान्स, अकाऊंटस आणि टॅक्सेशन, प्लॅनिंग आणि डेव्हलपमेंट, इंटरनॅशनल बॅंकिंग, ट्रेझरी, क्रेडिट मॉनिटरिंग आणि सुपरव्हिजन, व्हिजिलन्स अशा विविध पदांवर काम पाहिले. बॅंकेच्या मुख्य कार्यालयात जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी ते उत्तर बंगळूरु आणि चेन्नई मध्ये बॅंकेचे विभागीय प्रमुख होते.
राजीव यांचा भारतात आणि परदेशात विविध व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमांत सहभाग राहिला आहे. यामध्ये अॅडव्हान्स लिडरशीप प्रोग्रॅम, ईडीपी, रिस्क मॅनेजमेंट, आयएफआरएस, फिनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टस, डेरीव्हेटिव्हज अशा प्रशिक्षण कार्यक्रमांचा समावेश होता.
राजीव हे गणित विषय घेऊन पदवीधर झाले आहेत. एफसीए, एमबीए, डीआयएसए, आणि सीएआयआयबी याचेही व्यावसायिक शिक्षण त्यांनी घेतले आहे.

श्री. ए. बी. विजयकुमार
कार्यकारी संचालक

श्री. ए. बी. विजयकुमार
श्री. ए. बी. विजयकुमार १० मार्च २०२१ रोजी बँक ऑफ महाराष्ट्र येथे कार्यकारी संचालक या पदावर रूजू झाले. बँकिग क्षेत्रात श्री. विजयकुमार यांचा ३६ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून त्यांनी बँकेच्या बाह्य क्षेत्रात तसेच प्रशासकीय कार्यालयात महत्त्वाच्या कार्यक्षेत्रांमध्ये जसे की, लार्ज कार्पोरेट, रिटेल बँकिग, प्रायॉरिटी सेक्टर, फॉरेक्स ऑपरेझन्स, कप्लायन्स, बोर्ड, सेक्रेटरीएट, एच आर आणि व्हिजिलन्स विभागांमध्ये महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत.
बँकिंग क्षेत्रात त्यांनी बँक ऑफ इंडियामधून कामाची सुरुवात त्यांनी केली आणि सन २०१८ मध्ये ते महाप्रबंधक या पदावर पोहोचले. ‘बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये दाखल होण्यापूर्वी ते १ एप्रिल २०२० पासून इंडियन ओव्हरसीज बँकेत मुख्य दक्षता अधिकारी म्हणून कार्यरत होते. इंडियन ओव्हरसीज बँकेत रूजू होण्याआधी त्यांनी पूर्वाश्रमीच्या कॉर्पोरेशन बँकेत मुख्य दक्षता अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
श्री. विजयकुमार यांनी देशाच्या कानाकोपर्यात ब्रँच मॅनेजर या नात्याने यशस्वी कारकीर्द पूर्ण केली. इंडियन ओव्हरसीज बँकेच्या हाँगकाँग येथील शाखेत त्यांना मुख्य अनुपालन अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. बँकेच्या कर्मचाऱ्यांना सर्वंकष प्रदान करणाऱ्या स्टाफ ट्रेनिंग कॉलेजमध्येही काही काळ काम करण्याची संधी त्यांना मिळाली. झोनल मॅनेजर या पदावर काम करताना बँकेची व्यावसायिक वृद्धी करण्यात ते यशस्वी झाले. सन २०१८ मध्ये मध्यप्रदेश ग्रामीण बँकेचे चेअरमन म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानंतर पुढे पूर्वाश्रमीच्या कॉर्पोरेशन बँकेत मुख्य दक्षता अधिकारी म्हणून नियुक्त होण्याआधी त्यानी मध्यप्रदेश ग्रामीण बँकेची वृद्धी घडवून आणली.
श्री. विजयकुमार हे ‘कॉमर्स आणि लॉ’चे पदवीधर असून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकर्स (सीएआयआयबी) या संस्थेचे मान्यताप्राप्त सहयोगी आहेत. त्यांच्याकडे विविध व्यावसायिक गुणवत्ता, जसे की, ट्रेड फायनान्स, फॉरेन एक्स्चेंज, केवायसी अॅण्ड एएमएल, रिटेल बँकिंग, कस्टमर सर्व्हीस अॅण्ड बीसीएस यामधील अभ्यासक्रमाची प्रमाणपत्रे आहेत. त्यांनी लीडरशिप डेव्हलपमेंट, कॉर्पोरेट क्रेडिट अशा विषयांवर देशात आणि विदेशात विविध प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतलेला आहे.

श्री. आशीष पांडे
कार्यकारी संचालक

श्री. आशीष पांडे
श्री. आशीष पांडे यांची बँकिंग क्षेत्रात प्रागतिक अशा स्वरूपाची गेल्या २४ वर्षांची कारकीर्द आहे. ते बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ३१ डिसेंबर २०२१ रोजी कार्यकारी संचालक या पदावर रूजू झाले. त्यांनी त्यांच्या आधीच्या कार्यकाळात क्रेडिट, क्रेडिट मॉनिटरिंग, ट्रेझरी ॲण्ड मर्चंट बँकिंग, फॉरेन ट्रान्झॅक्शन्स ॲण्ड जॉईट व्हेंन्चर्स, मार्केटिंग ॲण्ड कस्टमर रिलेशनशिप्स ॲण्ड बँकिंग ऑपरेशन्स अशा विविध विभागांमध्ये जबाबदार्या सांभाळल्या आहेत.
श्री. पांडे हे मेकॅनिकल इंजिनियर (ऑनर्स) असून त्यांच्याकडे फायनान्स आणि मार्केटिंगमधील विशेष गुणवत्तेसह व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी (ऑनर्स) आहे. ते इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ बँकर्स या संस्थेचे प्रमाणपत्रधारक सहयोगी आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडे इन्शुअरन्स (लाइफ आणि नॉन लाइफ), म्युच्युअल फंड्स ॲण्ड डी-मॅट ऑपरेशन्सचे एनएससी प्रमाणपत्र आहे. श्री. पांडे यांनी एक्झीक्युटीव्ह लीडरशिप अभ्यासक्रम केलेला असून ते बंगलोर आयआयएमचे माजी विद्यार्थी आहेत.
श्री. पांडे यांनी त्यांची बँकिंग क्षेत्रातील कारकीर्द कार्पोरेशन बँकमध्ये इंडस्ट्रियल फायनान्स शाखा, मुंबई येथे सुरू केली, त्याचप्रमाणे त्या बँकेच्या इन्व्हेस्टमेंट ॲण्ड इंटरनॅशनल बँकिंग डिव्हीजनमध्येही त्यांनी काम केले.
त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडियामध्ये ज्या टीमने बँकेचा लाईफ इन्शुअरन्स आणि म्युच्युअल फंडचा व्यवसाय उभारला अशा टीमचे ते प्रोजेक्ट मॅनेजर होते. त्यांनी बँकेच्या इंडस्ट्रिअल फायनान्स ब्रँच, मुंबई येथे काम केले आणि त्या नंतर बँकेच्या सरल (स्पेशलाईज्ड क्रेडिट प्रोसेसिंग सेल) या विभागाचे नेतृत्व केले आणि त्या पाठोपाठ बँकेच्या ‘‘चेअरमन सेक्रेटरिएट’चे ते प्रमुख म्हणून नियुक्त झाले. श्री. पांडे यांनी राजस्थान राज्यात जयपूरमध्ये रीजनल हेड (डेप्युटी जनरल मॅनेजर) म्हणून काम केले आणि या विभागाने सर्व व्यवसायांमध्ये सर्वंकष कामगिरी बजावली.
महाप्रबंधक या पदावर काम करताना ते बँकेच्या क्रेडिट मॉनिटरिंग ॲण्ड रिस्टक्चरिंग डिपार्टमेंटचे प्रमुख या पदावर होते. त्या कालावधीत बँकेच्या कर्ज व्यवसायात आवश्यक अशा कामकाजाचा संपूर्ण आढावा डाटा अनॅलिसिस आणि प्रेडिक्टिव्ह (भविष्यसूचक) मॉडेलचा अभ्यास करून घेतला, जो अत्यंत उपयुक्त ठरला.
मुख्य महाप्रबंधक या पदावर बढती मिळाल्यानंतर ते विलिनीकरण झालेल्या यंत्रणेचे चीफ ऑपरेशन्स ऑफीसर (सीओओ) झाले, त्यांनी बँकिंग क्षेत्रातील सर्व प्रकारच्या कामकाजाचे एकत्रिकरण केले. तेथे रिइंजिनियरिंग, हार्मोनायझेशन, ऑटोमेशन आणि डिजिटायझेशन इत्यादी प्रक्रिया पार पडल्या. श्री पांडे हे बँकेच्या शीर्शस्थ गटाचे महत्वाचे सदस्य होते, ज्या गटाने बँकेच्या अमाल्गमेशन आणि डिजिटायझेशनची प्रक्रिया पार पाडली.
त्याचप्रमाणे श्री. पांडे हे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसह आयबीएने प्रायोजित केलेल्या बोर्ड ऑफ पीएसबी अलायन्स प्रायव्हेट लिमिटेडचे नियुक्त संचालक आहेत.

श्री ललित कुमार चंदेल
शासकीय नामनिर्देशित

श्री ललित कुमार चंदेल
श्री. ललित कुमार चंदेल यांची 18 ऑगस्ट 2021 रोजी बँक ऑफ महाराष्ट्रच्या संचालक मंडळावर भारत सरकार नियुक्त संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे.
श्री. ललित कुमार भारतीय आर्थिक सेवा – इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस (IES) (1995 ची तुकडी) चे अधिकारी आहेत. सध्या ते आर्थिक सल्लागार, वित्तीय सेवा विभाग, अर्थ मंत्रालय, भारत सरकार नवी दिल्ली या पदावर आहेत. श्री. ललित कुमार यांनी अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी, एम.बी.ए. आणि फेलो ऑफ इन्शुरन्स या पदव्या प्राप्त केल्या आहेत.
त्यांच्या सध्याच्या पदनियुक्तीपूर्वी श्री. ललित कुमार आय.सी.आय.सी.आय. बँक लि. च्या संचालक मंडळावर सरकार नियुक्त संचालक होते. त्यांनी भारत सरकारच्या विविध विभागांमध्ये अनेक पातळ्यांवर काम केले आहे, ज्यात बँकिंग, विमा क्षेत्र, भांडवल बाजार, परकीय मदत, ग्रामीण विकास, उर्जा, सिंचन आणि आरोग्य यांचा समावेश आहे. त्यांनी संचालक (विमा), वित्तीय सेवा विभाग, अर्थ मंत्रालय, कार्यकारी संचालक, सीव्हीओ आणि वित्तीय सल्लागार, विमा नियंत्रण आणि विकास प्राधिकरण (IRDA) आणि पूर्णवेळ संचालक (वित्त) तेलंगण राज्य विद्युत निर्मिती कंपनी या पदांवर काम केले आहे.
IES अधिकारी असलेल्या श्री. ललित कुमार यांची सुरुवातीची नियुक्ती संशोधन अधिकारी, सिंचन आणि CAD विभाग, म्हणून तत्कालीन योजना आयोगामध्ये झाली होती. त्यांच्याकडे गुंतवणुक स्पष्टता देण्यासाठी सिंचन प्रकल्पांची प्रकरणे तपासण्याचे काम होते.
यापूर्वी श्री. ललित कुमार यांनी भारत सरकार नियुक्त संचालक म्हणून नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि., ओरिएण्टल इन्शुरन्स कं. लि., कॉर्पोरेशन बँक, अग्रिकल्चरल इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया आणि नॅशनल इन्शुरन्स अकादमी या ठिकाणी काम केले.

श्री एम. के. वर्मा
आरबीआय नामनिर्देशित

श्री एम. के. वर्मा
श्री. एम. के. वर्मा यांची १३ ऑगस्ट २०१९ रोजी बॅंक ऑफ महाराष्ट्र मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नामनिर्देशित संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. कला शाखेची मास्टर पदवी (एम.ए) घेतल्यानंतर एमबीए (फायनान्स) आणि भारतीय बॅंकर्स इन्स्टिट्यूट ऑफ सर्टिफाइड असोसिएट यांचा अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) मध्ये बँक आणि वित्तीय संस्थांचे नियमन व पर्यवेक्षण, चलनविषयक धोरण तयार करणे, वित्तीय बाजारपेठेचे नियमन व पर्यवेक्षण, चलन व्यवस्थापन अशा विविध पातळीवर तीन दशकांहून अधिक काळ काम करण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे.
बिहार आणि झारखंडमधील रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे प्रादेशिक संचालक म्हणून ते सेवानिवृत्त झाले. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या सेवेत जाण्यापूर्वी त्यांनी बिहार विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक, बिहार सरकारचे उपजिल्हाधिकारी म्हणूनही काम केले आह
कायदा आणि व्यवस्थापनाचे शिक्षण देणाऱ्या आयआयटीएस, आयआयएमएस, एक्सएलआरआय, एक्सआयएसएस आणि विधी महाविद्यालय अशा विविध संस्थाचे ते अतिथी व्याख्याते आहेत.
फेड रिझर्व्ह (वॉशिंग्टन) येथे बँकिंग पर्यवेक्षणावरील विविध चर्चासत्र व प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता. बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट या विषयावर बेसल (स्वित्झर्लंड), इनसेड, (पॅरिस) येथे झालेल्या चर्चासत्रातही त्यांचा सहभाग होता.
ते सध्या सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि आयसीएफएआय बिझनेस स्कूल, पुणे या संस्थांचे अतिथी प्राध्यापक आहेत.

श्री. राकेश कुमार
भागधारक संचालक

श्री. राकेश कुमार
श्री. राकेश कुमार यांची बँकेच्या संचालक मंडळावर भागधारक संचालक म्हणून ३० जून २०२१ पासून ३ वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
लाईफ इन्शुरन्स काँर्पोरेशन आँफ इंडियामध्ये शाखा / कार्यालये या ठिकाणी इन्शुरन्स अँड बँकिंग, मार्केटिंग स्ट्रँटेजी,अॅडमिनिस्ट्रेशन अँड ह्यूमन रिसोर्सेस अशा विविध क्षेत्रांत त्यांचा ३६ वर्षांचा अनुभव आहे.
श्री. राकेश कुमार यांनी एल आय सी आँफ इंडियामध्ये एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर (बँक ॲण्ड ॲशुअरन्स चॅनेल ) या पदावरही काम केले आहे.
सध्या ते एल.आय.सी. कार्ड्स सर्व्हीसेस लिमिटेड (लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांची उपकंपनी) मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक आहेत.

श्री. शशांक श्रीवास्तव
अर्धवेळ अशासकीय संचालक

श्री. शशांक श्रीवास्तव
श्री. शशांक श्रीवास्तव बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये बँकेचे अर्धवेळ अ-कार्यालयीन संचालक म्हणून २१-१२- रोजी तीन वर्षांच्या कालावधीसाठी रूजू झाले.
श्री. शशांक श्रीवास्तव यांच्याकडे अकाउंट्स, ऑडिट, टॅक्सेशन, कॉर्पोरेट कन्सल्टन्सी आणि संबंधित क्षेत्रात काम करण्याचा ३० वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे. ते पेशाने प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकौंटंट असून मेसर्स शशांक प्रेमचंद ॲण्ड कंपनी, चार्टर्ड अकाउंटंट कटनी, मध्यप्रदेश यांचे सन १९८९ पासून सिनिअर पार्टनर आहेत.
श्री शशांक श्रीवास्तव हे एम. कॉम, फेलो चार्टर्ड अकौंटंट (एफसीए) आहेत.
ते काही सामाजिक संस्थांचे सदस्य आणि खजिनदार आहेत.

श्री. सरदार बलजित सिंग
अर्धवेळ अशासकीय संचालक

श्री. सरदार बलजित सिंग
श्री. सरदार बलजित सिंग हे बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये २१-१२-२०२१ रोजी तीन वर्षांच्या कालावधीसाठी अर्धवेळ अ-कार्यालयीन संचालक म्हणून रुजू झाले.
श्री सरदार बलजित सिंग यांना अकौंटस, जीएसटी ऑडिट, ब्रांच ऑडिट, स्टॅच्युटरी ऑडिट, रेव्हन्यू ऑडिट ऑफ पब्लिक सेवटर बॅक्स ॲण्ड रीजनल रुरल बॅक्स, आर्थिक समावेशन , इन्कम टॅक्स, कार्पोरेट कन्सल्टन्सी इत्यादीचा अनुभव आहे. ते पेशाने प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकौंटंट आहेत आणि ते मेसर्स पी. कृष्णा अगरवाल ॲण्ड असोसिएटस् चार्टर्ड अकाउंटंट, बलिया, उत्तर प्रदेश यांचे पार्टनर आणि ब्रांच हेड आहेत.
श्री. सरदार बलजित सिंग हे बी.कॉम., एल.एल.बी., चार्टर्ड अकाउंटंट (सी.ए) डिप्लोमा इन इन्फर्मेशन सिस्टीम ऑडिट, डिप्लोमा इन. इन्शुअरन्स ॲण्ड रिस्क मॅनेजमेंट या पदव्या धारण केल्या आहेत.
ते बलिया चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीज, बलिया च्या संचालक मंडळाचे सदस्प असून काही सामाजिक संस्थांचे सदस्य आहेत.