तरल व्याजदर सेव्हिंग्ज बाँड्स (करपात्र)
- केंद्र सरकारने १ जुलै २०२० पासून सुरू झालेल्या तरल व्याजदर सेव्हिंग्ज बॉड्स (करपात्र) योजनेची घोषणा केली आहे.
- पात्रता: सदरचे बाँड्स कोणत्याही व्यक्तींसाठी (सहधारकत्वासह) आणि हिंदू अविभाजित कुटुंबे यांच्यासाठी गुंतवणूक करण्याकरिता खुले आहेत. या बाँड्समध्ये अनिवासी भारतीयांना गुंतवणूक करता येणार नाही..
- वैशिष्ट्ये: सदर योजनेची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:
- या योजनेसाठीचे अर्ज बाँड लेजर अकौंट स्वरूपात यासाठी बँकेने निश्चित केलेल्या शाखांमध्येच स्वीकारले जातील. अशा निश्चित करण्यात आलेल्या बँक शाखांची यादी पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.
- सदरचे बाँड्स फक्त अ-वर्धित पद्धतीने जारी करण्यात येतील. सदर बाँड्सवरील व्याज सहामाही पद्धतीने प्रत्येक वर्षीच्या १ जानेवारी आणि १ जुलै या दिवशी देय असेल. १ जानेवारी २०२१ साठीचे कूपन ७.१५% दराने देण्यात येईल. पुढील सहा महिन्यांसाठीचे दर प्रत्येक सहा महिन्यांनी घोषित करण्यात येतील. वर्धित पद्धतीने व्याज अदा करण्याचा कोणताही पर्याय उपलब्ध नाही.
- या बाँड्समध्ये गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाही.
- आयकर : या बाँड्सधारकाच्या विद्यमान स्थितीनुसार, इन्कमटॅक्स ॲक्ट १९६१ अनुसार या बाँड्सवरील व्याज करपात्र असेल.
- मालमत्ता कर : सदरचे बाँड्स, वेल्थटॅक्स-ॲक्ट १९७५ अनुसार मालमत्ता करापासून मुक्त आहेत.
- सदरचे बाँड्स जारी करण्यात आल्याच्या तारखेपासून ७ (सात) वर्षांची मुदत संपल्यानंतर परत करण्यात येतील. मुदतपूर्व परतफेडीची सुविधा फक्त ज्येष्ठ नागरिकांच्या विशिष्ठ श्रेणीसाठी मान्य असेल.
- सदरचे बाँड सेकंडरी मार्केटमध्ये व्यापार करण्यासाठी नाहीत आणि कोणत्याही बँकिंग इन्स्टिट्यूट्स, नॉन-बँकिंग फिनान्शिअल कंपनीज अथवा फिनान्शियल इन्स्टिट्यूट्स येथे कर्जासाठी हमी म्हणून ठेवता येणार नाहीत.
- या बाँड्सचा एकमेव धारक किंवा एकमेव वारस, एकट्याने वारसाची नियुक्ती करू शकेल.