शैक्षणिक कर्ज योजना

अनुमानित/ मान्यताप्राप्त(क्रेडिटेड) विद्यापीठे/संस्था आणि व्यावसायिक अभ्यासक्रम --व्याजी अर्थसाहाय्य योजना/इंटरेस्ट सबसिडी स्कीम

शैक्षणिक कर्जासंबद्धी माहिती

उद्देश भारतामध्ये आणि विदेशात अभ्यासासाठी
अर्हता/योग्यता भारतामधील अभ्यासः  पदवी अभ्यासक्रम/यूजीसी तर्फे मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या अंतर्गत कॉलेजेस. यूजीसी/शासन/एआयसीटीई/एआयबीएमएस/आयसीएमआर इत्यादींतर्फे मान्यताप्राप्त पदविका/पदवी इत्यादींप्रत इतर अभ्यासक्रम.

विदेशात अभ्यासः : नोकरीसन्मुख व्यावसायिक/तांत्रिक/पदव्युत्तर अभ्यासक्रम/ पदव्युत्तर शिक्षणः एमसीए, एमबीए, एमएस इत्यादी
वय विद्यार्थी भारतीय नागरिक असावा, प्रवेश परीक्षा/गुणवत्ता पायाभूत निवडीने प्रवेश मिळवलेला असावा.
कमाल रक्कम भारतामध्ये: ` 10.00 लाख
विदेशामध्ये: ` 20.00 लाख
सुरक्षितता ` 4.00 लाख पर्यंत -- स्पष्ट/क्लीन-
हमीदार/गॅरंटर ` 4.00 लाख ते ` 7.00 लाख  
समाधानकारक तिसरी व्यक्ती हमीदार/थर्ड पार्टी गॅरंटी
` 7.00 लाख च्या वर
खाली नमूद केल्याप्रमाणे आवश्यक मार्जिन दिल्यानंतर आनुषंगिक सुरक्षिततेचे मूल्य आर्थिक परिमाण अधिक 2 स्वीकार्य हमीदार एवढे असावे. कर्जातून खरेदी केलेला कम्प्युटर तारणगहाण राखला जाईल.
मार्जिन/मर्यादा 4.00 लाख पर्यंत--काहीही नाही
` 4.00 लाख च्या वर
5% -- भारतातील अभ्यासासाठी 
15% -- विदेशातील अभ्यासासाठी
वजावट मर्यादा लागू नाही
व्याजदर Loans up to Rs. 4.00 lac = Base Rate + 2.50%
Loans above Rs. 4.00 lac & upto 7.50 lac = Base Rate + 2.00%
Loans above Rs.7.50 lac = Base Rate + 1.25%
  • Simple interest during moratorium period, there after compounded monthly
  • 1% interest concession may be provided to the loanees if the interest is serviced regularly as and when applied during the study period when repayment holiday is specified for interest/ repayment under the scheme. Interest concession is available only for moratorium period.
परतावा इएमआय -- 60 महिने (कर्ज + उपार्जित व्याज एकत्र)
अधिस्थगित/पुढे ढकललेल्या अभ्यासक्रम कालावधि + 1 महिना किंवा 6 महिने नोकरीवर रुजू झाल्यानंतर -- जे अगोदर असेल ते.
प्रक्रिया शुल्क काही नाही
विमा लागू नाही
अन्य
  • पालक सह-कर्जदार असलेल्या विद्यार्थ्याला कर्ज दिले जाईल
  • प्रत्यक्ष संस्था किंवा कॉलेजकडे आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने कर्ज सुपुर्द केले जाईल.
अन्य सुविधा आमच्या वेबसाइटवरून ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थी शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करू शकतो. ही सुविधा निवडक 75 शाखांमध्ये सध्या उपलब्ध आहे. (लवकरच ही संख्या ब-यापैकी वाढेल.)
 

आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जावर व्याजात सवलत


आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कर्जावर कर्जमुदतीच्या काळात व्याजात सवलत देण्याची प्रधान योजना

शैक्षणिक कर्ज योजनेअन्वये आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांनी घेतलेल्या कर्जाच्या मुदती दरम्यान पूर्ण व्याज सूट देण्याच्या योजनेला भारत सरकारने मान्यता दिली आहे. ही कर्जे भारतातील कुठल्याही मान्यताप्राप्त संस्थेतील तांत्रिक आणि व्यावसायिक स्वरुपाच्या प्रमाणित अभ्यासक्रमांपैकी कुठल्याही अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी ही योजना आहे.

या योजनेची मार्गदर्शक तत्वे आपल्या माहितीसाठी देत आहोत,ती खालीलप्रमाणे :

1. योजनेसाठी पात्रता

ही योजना भारतातील मान्यताप्राप्त तांत्रिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांपुरतीच मर्यादित आहे. व्याजातील सूट आमच्या बँकेच्या सध्याच्या आदर्श शैक्षणिक कर्ज योजनेशी संबंधित असेल. लोकसभेच्या कायद्यान्वये प्रस्थापित झालेल्या भारतातील शैक्षणिक संस्था, संबंधित कायदेशीर मंडळांनी मान्यता दिलेल्या अन्य संस्था, केंद्र/राज्य सरकारने स्थापन केलेल्या इंडियन इन्स्टीटय़ूटस ऑफ मॅनेजमेंट आणि अन्य संस्थांमधील तांत्रिक/व्यावसायिक अभ्यासक्रमात (बारावीनंतर ) प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपुरतीच ही योजना मर्यादित आहे.

2. व्याजातील सूट मिळण्यासाठी पात्रता

या योजनेअन्वये पात्र विद्यार्थ्यांना एकदाच व्याजातील सूट मिळू शकेल. भारतातील पहिल्या पदवीपर्यंतचा अभ्यासक्रम किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम/पदविका अशा अभ्यासक्रमांसाठी ही योजना आहे. तरीसुध्दा व्याज सवलत ही एकात्म अभ्यासक्रमांसाठीच असेल (पदवी + पदव्युत्तर )

या योजनेअन्वये मिळणारी व्याज सूट अभ्यासक्रम मध्येच सोडणा-यांना किंवा शिस्तीच्या अथवा शैक्षणिक कारणांवरुन संस्थामधून हकालपट्टी होणा-यांना मिळणार नाही. तरीसुध्दा अभ्यासक्रमातील खंड वैद्यकीय कारणांमुळे उदभवल्यास ही सूट मिळू शकेल, मात्र त्यासाठी त्या विशिष्ट शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखांना समाधानकारक वाटतील अशी आवश्यक ती कागदपत्रे द्यावी लागतात.

3. सूट लागू होण्याचा काळ

या योजनेअन्वये कर्जमुदतीच्या काळासाठी म्हणजेच अभ्यासक्रमाच्या कालावधीसाठी + नोकरी मिळाल्यानंतर एक वर्ष किंवा सहा महिन्यांनंतर, जो कालावधी लौकरचा असेल त्या कालावधीसाठी, बँकेच्या आदर्श शैक्षणिक कर्ज योजनेअन्वये निर्धारित केल्याप्रमाणे तांत्रिक/व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक कर्ज घेण्याबद्दल आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना बँकेला द्यावे लागणारे व्याज भारत सरकारकडून बँकेकडे जमा केले जाईल.

4. लागू होण्याचा शैक्षणिक कालावधी

ही योजना 1 एप्रिल, 2009 पासून सुरु झालेल्या 2009-10 या शैक्षणिक वर्षापासून लागू झाली. 2009-10 (मंजुरीच्या तारखेशी काही संबंध नाही ) या शैक्षणिक वर्षापासून सुरु होणारी कर्जाची रक्कमच केवळ व्याजातील सूट देण्याच्या या योजनेखाली येते.

टीप : 2009-10 या शैक्षणिक वर्षाआधी सुरु झालेल्या अभ्यासक्रमांसाठी देण्यात आलेल्या कर्जाऊ रकमांबाबत व्याजातील सवलतीच्या योजनेचा विचार केला जाणार नाही.

5. उत्पन्न मर्यादा

पालकांचे/कुटुंबाचे एकूण कमाल वार्षिक उत्पन्न रु.4.5 लाख प्रति वर्ष (सर्व स्त्रोतांमधून ) असलेल्या आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना या योजनेचे लाभ मिळू शकतील. सर्व स्त्रोतांमधून कुटुंबाची/पालकांची एकूण कमाल उत्पन्न मर्यादा वर निर्देश केल्याप्रमाणे असलेल्या आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी असलेली ही योजना सामाजिक पार्श्वभूमीपेक्षा आर्थिक निर्देशांकावर आधारित आहे.

6. आयकर प्रमाणपत्रासाठी असलेले सक्षम अधिकारी

केंद्र किंवा राज्य सरकारच्या योजनांप्रमाणेच या योजनेअन्वये आर्थिक परिस्थितीच्या प्रमाणपत्रासाठी राज्य शासनाने अधिकार दिलेल्या सरकारी अधिका-यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला विद्यार्थ्यांना सादर करावा लागतो.

महाराष्ट्रात आयकर प्रमाणपत्र देण्यासाठी तहसीलदारांना सक्षम अधिकारी म्हणून मान्यता आहे.

इतर राज्यांसाठी विद्यार्थी कर्जदारांनी अशा प्रकारची उत्पन्न प्रमाणपत्रे देण्याचा अधिकार मिळालेल्या सक्षम अधिका-यांच्या तपशिलांसंबंधी माहिती मिळवण्यासाठी आमच्या शाखा अधिका-यांशी संपर्क साधावा.

7. इतर

राज्य सरकारच्या अन्य योजनेअन्वये अशी सवलत घेतली जात नसल्यास या योजनेअन्वये व्याज सवलतीचा लाभ घ्यावा.

या योजनेअन्वये कर्जमुदती दरम्यान व्याज सवलतीचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करण्याकरिता (शैक्षणिक कर्जे जेथून घेतली असतील तेथे ) संबंधित शाखांमध्ये सर्व पात्र विद्यार्थी कर्जदारांनी भेटावे अशी विनंती आहे. व्याज सवलतीकरिता अर्ज सादर करण्यासाठी शाखा अधिका-यांना भेटण्याआधी वरील सर्व माहिती काळजीपूर्वक अभ्यासावी.

या योजनेअन्वये व्याज सवलतीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी कर्जदारांनी पुढील कार्यपध्दतीचा अवलंब करावा :

  1. मुद्दा क्र. 5 मध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे आयकर प्रमाणपत्र मिळवावे.
  2. सर्व योग्य ती प्रमाणपत्रे घेतली असल्याची खात्री करुन घ्यावी आणि संबंधित शाखांमधील अधिका-यांना भेटावे.
  3. सवलतीसाठी असलेला अर्ज सादर करावा. (शाखा अधिंकारी अर्ज/करारनामा देतील.)
Integrety Pledge by CVC

वापरकर्त्याची नियमावली - यूपीआय
शाखा शोधा (लोकेट करा)/ एटीएम
बँकेचे विलफुल डिफॉल्टर्स


RBI Monetary Museum - Reserve Bank of India

General Information about the Museum

सेंट्रल प्रोसेसिंग सेल्स (सीपीसीज्) -
कमर्शियल क्रेडिट, ज्यामध्ये कॉर्पोरेट, एमएसएमई आणि अन्य कर्जे—सर्वसाधारणपणे रु. 10.00लाखाच्या वर आणि रु. 5.00लाखापेक्षा जास्त कृषि-शर्ती कर्जे आणि सर्व रिटेल क्रेडिट यांच्यासहियांच्या प्रक्रियेकरिता व मंजूरीकरिता बँकेने सेंट्रल प्रोसेसिंग सेल्स (सीपीसीज्) ची स्थापना केली.
 
ई-एसबीटीआर -
मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क महाराष्ट्र बँकेचे इंटरनेट बँकिंगद्वारे भरणा

 

. फुगवटा निर्देशांकित राष्ट्रीय बचत सुरक्षा- संकलित/इन्फ्लेशन इंडेक्सड नॅशनल सेव्हिंग सिक्युरिटीज-क्युम्युलेटिव्ह

1 - उत्पादन तपशील
2 - अर्जाचा फॉर्म
3 - वारंवार विचारले जाणारे प्रश्न--आय आय एन एस एस-सी
 
चालू व बचत निष्क्रिय लेखाधारक ज्यांची सर्वसाधारण प्रवर्गात शून्य शिल्लक आहे, म्हणजेच प्रत्यक्ष लाभ लेखांतरण/इलेक्ट्रॉनिक लाभ लेखांतरण, /विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, याकरिता सार्वजनिक अधिसूचना

एटीएम आणि डेबिट कार्डाचे वार्षिक व्यवस्थापन शुल्क ` 100/- + सेवाभार दुस-या वर्षापासून लागू (ता. 01/03/2014 पासून)
 
ग्राहक शिक्षणः : भारतीय बँकनोटांसाठी सुरक्षिततेची वैशिष्ट्ये
 
थोडीशीच काळजी/सावधानता तुमचा ऑनलाइन व्यवहार अधिक सुरक्षित ठेवील.

1- इंग्लिश भाषांतर
 
सेवा-शुल्क परिशोधित--ता. 01/09/2013 पासून लागू
 
नविन पुनरावर्ती मुदत ठेव योजनाः महा-लक्षाधीश/मिलिऑनेर, महा लखपती व महासंचय प्रणालीबद्ध/सिस्टेमिक ठेव योजना
 
महाबँक सुवर्ण कर्ज योजना- सुवर्ण अलंकारांवर कर्जाची सोय
महासुपर गृह कर्ज
 
महासुपर कार कर्ज
 
अकौऊंट पोर्टेबिलिटी (खाते स्थलांतरण) बँकेच्या एका शाखेतून दुस-या शाखेत खात्याचे स्थलांतरण
 
व्हिसा डेबिट कार्ड वापराअन्वये ऑफर
 
नव्या रिकरिंग ठेवी योजना महामिलियनोअर, महालखपती आणि महासंचय सिस्टीमॅटीक डिपॉझिट प्लॅन आरडी योजना
 
बचत खात्यातील ठेवींवरील व्याज रकमा देण्याच्या तारखेत बदल
 
सेवा शुल्क
 
23 मार्च, 2011 रोजी 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या समभागधारकांची विशेष सर्वसाधारण सभा.
 
०१.११.२०११ पासूनचे सुधारित आरटीजीएस आकार
 
एलेक्ट्रोनिक अंतर्गामी (इनवर्ड) व्यवहार 01.01.2011 पासून पैसे पाठवणा-याने दिलेल्या लाभार्थीच्या खाते क्रमांक माहितीच्या आधारेच केवळ आरटीजीएस, एनइएफटी, एनइसीएस, इसीएस व्दारे केले जातील.
 
महाबँक ज्युवेल कर्ज योजना - सोन्याच्या दागिन्यांच्या तारणावर कर्ज
 
विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी गृह कर्जदारांसाठी `टॉप अप' कर्ज
 
`भारतीय विशेष व्यक्तित्वनिश्चिती मंडळा'बरोबर बँकेचा सहकार्य करार
 
देशांतर्गत मुदत ठेवींवरील व्याज
 
विशेष शाखांची यादी
आयात / निर्यात चलन
राज्यनिहाय सुट्ट्या
Visitor Counter
Stats
महत्त्वाचेः :बँक ऑफ महाराष्ट्र कोणत्याही कारणास्तव फोन/इमेल/एसएमएस द्वारे बँक खात्याचे तपशील कधीही विचारीत नाही.

बँक सर्व ग्राहकांना विनंती करत आहे की, अशा फोन/इमेल/एसएमएस यांना प्रतिसाद देऊ नये आणि त्यांचे बँक खात्याचे तपशील कोणत्याही कारणास्तव कोणालाही देऊ नये. तुमचा सीव्हीव्ही/डेबिट-पिन क्रमांक/क्रेडिट कार्ड कोणालाही देऊ नये.