महा ई ट्रेड

सुरक्षित, तत्पर आणि सुलभ ...

तणावमुक्त ऑन-लाईन गुंतवणूक आणि ट्रेडींग इन शेअर्स मध्ये आपले स्वागत आहे

“बँक ऑफ महाराष्ट्रने पुढील कंपन्यांबरोबर सहकार्य केले आहे :

या सुविधेमुळे नॅशनल स्टॉक एक्स्चेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज व्दारे दुय्यम भांडवली बाजारपेठेतील गुंतवणूक/ट्रेड इन शेअर करण्याची वेगवान, पारदर्शी आणि तणावमुक्त सुविधा उपलब्ध झाली आहे. एनएसइ आणि बीएसइ वरील शेअरमधील गुंतवणूक शेअर-ब्रोकरकडे न जाता करता येते. व्यवहारपूर्ततेच्या चक्राचा मागोवा घेणे, बचत खात्यामधील रकमा भरणे आणि स्वीकारणे, डिमॅट खात्यांमधील शेअर्सच्या रकमा भरणे आणि स्वीकारणे असे संबंधित तणावपूर्ण अडथळे दूर करण्यात आले आहेत. आता व्यावसायिक दौरा, सहल, सुटीमुळे दूरच्या एखाद्या ठिकाणी असताना इंटरनेट आणि लॅपटॉप/कॉम्प्युटर व्दारे शेअरबाजाराचे व्यवहार करता येतात. ब्रोकर्स साईट वरुन शेअरव्यवहार आणि गुंतवणुकीवरील जागतिक दर्जाचे संशोधन अहवाल विनाशुल्क मिळवता येतात. महा-इ-ट्रेड कशा पध्दतीने उपयुक्त ठरु शकते ? महा-इ-ट्रेड म्हणजे 3-इन-1 एकात्म खाते. बँक ऑफ महाराष्ट्र इच्छुक ग्राहकाचे बँकींग, डिमॅट आणि ट्रेडींग खाते यात एकात्मता आणते.
ग्राहक आपल्या बँकेच्या/डिमॅट खात्यातील उपलब्ध निधी आणि रोखे यांच्या जोरावर शेअर्सचा व्यवहार करु शकतो. अगदी सुरुवात करणा-यांच्या दृष्टीनेही शेअर व्यवहार खूपच सुलभ करण्यात आले आहेत.

बँकींग (बचत किंवा चालू ) खाते आमच्या कुठल्याही सीबीएस शाखेत उघडता येते (आधी उघडले नसल्यास ) आणि खाते उघडताना संबंधित शाखेत इंटरनेट बँकींग खाते उघडण्याचा फॉर्म भरुन द्यावा लागतो.

खाते कोणाला उघडता येते ?
व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंब-एचयूएफ, एनआरआय (देशांतर्गत किंवा परदेशातील) , सोसायटय़ा, ट्रस्ट, विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार, आंतरराष्ट्रीय बहुआयामी एजन्सी आणि ग्लोबल कस्टोडिअन, परदेशातील बॉडी कॉर्पोरेट, विदेशी नागरिक, व्यक्तींचा समूह - असोसिएशन ऑफ पर्सन्स, म्युच्युअल फंड, एस्क्रो, क्लिअरिंग मेंबर (ब्रोकर )

* मालकी तत्वावरचे व्यवसाय/भागीदारी फर्म/अनोंदणीकृत सोसायटी/खाजगी न्यास यांना खाते चालवता येते मात्र त्यासाठी असे खाते मालक/भागीदार/सोसायटी मेंबर/वैयक्तिक वर्गातील पहिले नाव असलेले विश्वस्त (जास्तीत जास्त तीन खातेधारक )

बँक/डिमॅट/ट्रेडींग खाते उघडण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे :
पत्त्याचा आणि ओळखीचा पुरावा
* खाते उघडण्याच्या फॉर्मवर तपशील उपलब्ध असतात.

तीन पासपोर्ट आकाराचे फोटोग्राफ

सूचना :

  • सेबी मार्गदर्शक तत्वाप्रमाणे सर्व डिमॅट/ट्रेडींग खात्यांसाठी पॅनकार्ड आवश्यक असते.
  • आवश्यक कागदपत्रांच्या फोटोकॉपीजवर ग्राहकांच्या सह्या लागतात आणि बँक अधिका-यांकडून त्यांची पडताळणी करुन घ्यावी लागते.

ठळक वैशिष्टय़े :

  • डिलीव्हरी आधारित प्रशिक्षण
  • व्यवहाराच्या दिवशीच व्यवहारपूर्तता
  • निधी/रोख्यांवर धारणाधिकार
  • निधिचे हस्तांतरण नाही
  • इतर नेहमीच्या डिमॅट सेवा

लॉग इन आणि पासवर्ड:
व्यवहाराचे खाते -ट्रेडींग अकाऊंट - उघडल्यावर ब्रोकर ग्राहकांची नोंदणी करेल आणि ग्राहकांना व्यवहारासाठी असलेल्या त्यांच्या वेबसाईटशी संधान साधता यावे म्हणून त्यांचा लॉग-इन आयडी आणि पासवर्ड पाठवेल/इ-मेल करेल.

सेवा आकार:

ब्रोकरला द्यावयाचे आकार :
ज्या संबंधित ब्रोकरकड ट्रेडींगचे खाते उघडले आहे/चालवले जात आहे, त्याच्या प्रॉडक्ट प्लॅन/टेरिफ ऑफ प्रमाणे ऑन-लाईन ट्रेडींग आकार आकारले जातात.
• ट्रेडींग खाते उघडणे/कार्यान्वित करण्याचे आकार - विना आकार किंवा जास्तीत जास्त रु.1000/- (ब्रोकरच्या विविध खात्यांच्या योजनांवर आधारित )
• डिलीव्हरी ब्रोकर आकार - 0 % ते 0.5 %
• व्यवहाराच्या दिवशीचे ब्रोकरेज - 0 % ते 0.5 %
(व्यवहाराचे प्रमाण आणि ब्रोकरच्या विविध योजनांवर आधारित आकार)

आकारले जाणारे तपशील बऎाoकरच्या त्या त्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

बँकला द्यावयाचे आकार :
डिमॅट खाते देखभाल आकार - रु.300/- प्रति वर्ष - व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंब - एचयूएफ - एनआरआय आणि ट्रस्टस साठी. कॉर्पोरेट आणि अन्य घटकांसाठी रु.1,000/- प्रति वर्ष. व्यवहार आधारित आकार वेगळे.

याचे तपशील वेबसाईटवर सेवा आकार या शीर्षकाखाली उपलब्ध आहेत.

सूचना : या वेबसाईटवरील माहिती आणि त्यातील मजकूर `बँक ऑफ महाराष्ट्र` चे सर्वसाधारण आकलन व्हावे, तसेच `बँक ऑफ महाराष्ट्र` च्या विविध योजनांची समाजाला अधिक चांगली कल्पना यावी या हेतूने दिले आहेत.

अधिक माहिती हवी असणा-यांना `बँक ऑफ महाराष्ट्र`शी संपर्क साधावा लागेल. या साईटवरील मजकूर `बँक ऑफ महाराष्ट्र`च्या संमतीशिवाय पूर्णपणे किंवा अंशत: अशा कोणत्याही प्रकारे नक्कल करुन वापरता येणार नाही, त्याचे कुठे प्रदर्शनही करता येणार नाही किंवा तो छापूनही घेता येणार नाही.

प्रस्तुत विभागातील माहिती आणि मजकूर `बँक ऑफ महाराष्ट्र`च्या अंतिम अधिकारानुसार जेव्हा जेव्हा वेळोवेळी बदल होतील, त्याप्रमाणे बदलू शकतात.

`बँक ऑफ महाराष्ट्र` या वेबसाईटवरील मजकुराबद्दल व्यक्त किंवा सूचित अशी कोणतीही हमी/प्रातिनिधिकता देत नाही/मानत नाही.

खालील बाबींबाबत `बँक ऑफ महाराष्ट्र` जबाबदार असणार नाही :

  • या साईटच्या वापरामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नुकसान किंवा हानी उदभवल्यास
  • साईटमधील कोणत्याही स्वरुपाच्या चुका किंवा टंकलेखनाच्या चुका इ. असल्यास.

संबंधित माहितीसाठी इच्छुक व्यक्तींना अन्य वेबसाईटच्या लिंकही कळवल्या जातात मात्र अशा साईटमधील मजुकराबाबत `बँक ऑफ महाराष्ट्र` कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाही.
कोणत्याही व्यक्तीला/व्यक्तींना किंवा इंटरनेट पत्ताधारकांना या साईटशी संधान नाकारण्याचे किंवा मना करण्याचे सर्व हक्क `बँक ऑफ महाराष्ट्र` असतील.

 

“Direct Selling Agent” for Housing Loan
उद्यमी मित्र
अटेन्शन एनआरआय कस्टमर्स
इंटिग्रिटी प्लेज सीव्हीसी तर्फे

वापरकर्त्याची नियमावली - यूपीआय
शाखा शोधा (लोकेट करा)/ एटीएम
बँकेचे विलफुल डिफॉल्टर्स
Processing fee waived off on Housing Loan & Vehicle Loan w.e.f. 01.09.2017 to 31.12.2017

तारीख 07-10-2017 पासून लागू असलेले परिशोधित मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडस् बेस्ड लेन्डिंग रेट (एमसी एलआर)

तारीख 01-02-2016 च्या अधिसूचनेच्या सेवा शुल्कातील सुधारणा 01-08-2017 पासून लागू

तारीख 01/07/2017 पासून लागू असलेले सीएमएस शुल्क य़य़

FAQs International Debit Card

A Little extra care makes your online transactions more secure

Account Portability : Transfer of account from one branch to another branch in the Bank

Bank's Codes of Commitments to Customers

List of branches authorized for opening of PPF Account

RBI Monetary Museum - Reserve Bank of India

General Information about the Museum
विशेष शाखांची यादी
आयात / निर्यात चलन
राज्यनिहाय सुट्ट्या
Visitor Counter
Stats
महत्त्वाचेः :बँक ऑफ महाराष्ट्र कोणत्याही कारणास्तव फोन/इमेल/एसएमएस द्वारे बँक खात्याचे तपशील कधीही विचारीत नाही.

बँक सर्व ग्राहकांना विनंती करत आहे की, अशा फोन/इमेल/एसएमएस यांना प्रतिसाद देऊ नये आणि त्यांचे बँक खात्याचे तपशील कोणत्याही कारणास्तव कोणालाही देऊ नये. तुमचा सीव्हीव्ही/डेबिट-पिन क्रमांक/क्रेडिट कार्ड कोणालाही देऊ नये.